madak fodi.jpg
madak fodi.jpg 
मराठवाडा

अंबाजोगाईत महाबळेश्‍वराचा 'फील'; 'मडकं फोडी दरी' ने केले आकर्षित 

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई :  मडकं हे नाव आपण ऐकलेले आहे. परंतू मडकं फोडी दरी अन् त्यात कोसळणारा धबधबा आपण कधीच पाहिला आणि ऐकलंही नसेल. हे निसर्ग सौंदर्य अंबाजोगाई तालुक्यातील चनई शिवारात बघायला मिळते. अगदी महाबळेश्वर या पर्यटन स्थळांला लाजवेल असे हे ठिकाण आहे. परंतू हे ठिकाण दिसायला जितके सुंदर तितकेच तिथे जाण्यासाठी अडचणीचे व कठीण आहे. काही शिक्षकांनी या ठिकाणाची सैर केली. त्यामुळे हे स्थळ नव्याने परिचित झाले. 

बालाघाटच्या रांगेत असलेल्या या परिसराला निसर्गाचीच देण लाभलेली आहे, परंतू पर्यटन विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे या परिसराला पर्यटन स्थळांचा दर्जा प्राप्त होऊ शकला नाही. मुकुंदराज, नागनाथ, बुट्टेनाथ, घोडदरी, डोंगरतुकाई, भैरवनाथ म॔दिर, मांडवा पठाण या परिसरात हे सर्व निसर्ग सौंदर्य फुललेले आहे. चनई शिवारातही या मडकं फोडी दरीसह इतर निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणं आहेत. परंतू ते दुर्लक्षित आहेत.

अशी आहे मडकं फोडी दरी
शहरापासून चार किलो मिटर अंतरावर व चनई ते चनई तांडा शिवारात ही मडकं फोडी दरी आहे. त्यातच उंचावरून धबधबा कोसळतो. ही दरी अतिशय अरूंद व खोल आहे. तिथे पोहण्यासाठी खडतर रस्त्याने जोखीम पत्करून जावे लागते, अगदी डोंगर उतरून पाऊल रस्त्याने पोचता येते. मुख्य रस्त्यापासून एक किलोमिटर आत चालत जावे लागते. अगदी दरीच्या जवळ पोचण्यासाठी काही अंतर पाण्यातून मार्ग काढत जावे लागते. जवळ गेल्यानंतरही धबधब्याजवळ मात्र जाता येत नाही. कारण दोन्ही बाजूने पहाडी असल्याने कोणत्याही क्षणी वरून पहाडीचा दगड कोसळण्याची शक्यता असते. दरीत पाणी असल्याने तिथे पोचणे शक्यही होत नाही. या दरीची उंची शंभर फुट असेल, रुंदी मात्र अगदी कमी म्हणजे पाच ते सहा फुट एवढीच आहे. पाऊस ओसरल्यानंतर व डोंगर परिसरातील पाण्याचा पाझर बंद झाल्यावर धबधबा कोसळणे बंद होतो, परंतू दरीत मात्र उन्हाळ्यात सुध्दा पाणी असते. यात कोसळणा-या धबधब्यांचे स्वच्छ पाणी पुढे खळखळत वाण नदीला जावून मिळते.

मडकं फोडी का म्हणतात 
या दरीपर्यंत पोचण्याचा मार्ग कठीण आहे. एखादे वेळेस पाय घसरून जर पडले, तर डोके फुटते. हे डोके म्हणजे मडके फुटते असा शब्दप्रयोग जुन्या काळापासूनच होत आल्यामुळे याचे नाव 'मडकं फोडी दरी' असे पडलेले आहे. असे या गावातील शिक्षक ज्ञानोबा कदम यांनी सांगितले.  हौशी छायाचित्रकार संतोष कदम व रत्नाकर निकम यांनी आपले मित्र ज्ञानोबा कदम यांच्यासोबत मडकं फोडी दरीची सैर केली. हे ठिकाण खाजगी जागेत असले तरी, पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर असे हे ठिकाण आहे.  या परिसरात खडक असल्याने तेवढी दाट झाडी नाही. निसर्गतः च फुललेली वृक्षवल्ली या परिसराचे सौंदर्य खुलवते, काही वन्य प्राणीही या परिसरात आहेत. डोंगर द-यांनी व ठिकठिकाणच्या ओहोळांच्या पाण्याने या परिसराला आणखीनच देखनेपणाची झालर चढवलेली आहे. या परिसरामुळे अंबाजोगाई तालुक्यातील निसर्ग सौंदर्यात मात्र भर पडली आहे. 

(Edit- Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT