मुरत1.jpg 
मराठवाडा

शिल्पकलाकराची 'मुरत' आतंरराष्ट्रीय महोत्सवात!

मनोज साखरे

औरंगाबाद : एखाद्या शिल्पकलाकाराने निर्मिलेल्या विश्‍वात पंचविशीतील उमद्या तरुणीने प्रवेश करावा. त्याने साकारलेले विविध शिल्प आशाळभूत नयनांनी पाहतच राहावे. त्या शिल्पाला नाजूक, हळुवार स्पर्श केल्यानंतर या निर्मीत शिल्पातही स्वतःत्वाचा शोध घ्यावा. आपली हुबेहुब प्रतिमा साकारावी हेच जणू तिच्या नयनांतून व्यक्त व्हावे. मग मंद पावले टाकीत एक एका शिल्पावर तिची नजर भिरभिरावी अन् नयन अलगद लागताना शिल्पकार यावा आणि त्याने तिचे शिल्प साकारण्यासाठी सरसावावे. अशी सुरुवात असलेला ‘मुरत’ हा लघूपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात पोचला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
संवाद नसतानाही केवळ भावनांनी ओतप्रेत भरलेली आशाळभुत नजर, शिल्पकाराचा कटाक्ष, आणि कलेविषयीची बांधिलकी आणि अभिजात बंदीशवरच हा लघुपट सुरुवात करतो व थांबतो. ‘ती’चे शिल्प साकारताना व ते सजीव व्हावे यासाठी प्राणही ओततानाची कलाकराची ती मुद्रा भावविभोर करते. तहान, भूक विसरुन शिल्पकार त्याच्या शिल्पनिर्मितीतच रममाण असतो. त्याच्यासाठी केवळ तेच जग असते. शिल्पानेच शिल्पकाराच्या प्रेमात पडावे; हलकासा ओठाने स्पर्श करावा हे अत्युच्च काल्पनिक क्षणही या लघूपटात चित्रित केले गेले आहे. 

सुनील देवरे हे प्रतिभावंत शिल्पकार आहेत. त्यांनी ‘मुरत’ लघुपटाचे दिग्दर्शन केले असुन  अॅक्टींगही केली आहे. त्यांच्यासोबत लघुपटात कलाकार ऋतूजा गांवकर यांनी काम केले. संगीत व गायन ज्येष्ठ गायिका आरती पाटणकर, संपादन गुंजन लोकरे, सिनमॅटोग्राफी समीर कानगुटकर यांनी केली. ‘सिनेक्युस्ट फिल्म  अॅन्ड व्हीआर फेस्टीव्हल्स’, लेब्यू इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, बोरड्यूक्स लॅटीन अमेरिकन फिल्म, इन द पॅलेस इंटरनॅशनल शार्टफिल्म या महोत्सवात हा लघूपट दाखविला जाणार आहे. युट्यूबवरही हा लघुपट अपलोड झाला आहे. 

अभिजात बंदीश गुंतवूण ठेवणारी 
लघूपटात ‘मेरे सावरिया बाजू बंद खुल-खुल जाये’ ही अभिजात बंदीश आहे. शेकडो वर्षांपासून ही अभिजात बंदीश अनेक गवय्ये गात आले आहेत. ही बंदीश ज्येष्ठ गायिका आरती पाटणकर यांनीही खुबीने गायली. लघूपट ऐकताना त्यांच्या जादूई, कर्णमधूर स्वर व संगीतात श्रोता- दर्शक पुर्णतः बुडून जातो. 

कोण आहेत सुनील देवरे 
सुनील देवरे औरंगाबादेतील असून त्यांचे शिक्षण येथेच स्कुल ऑफ आर्ट व त्यानंतर मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्ट या संस्थेत झाले. त्यांना दिल्लीतील इंदीरा गांधी फाऊंडेशन अवार्डसह अनेक पुरस्कार प्राप्त असुन त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT