Attack on Tahasildar At Parnda dist Osmanabad 
मराठवाडा

उस्मानाबाद : वाळूमाफियाने घातला तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर, प्रकृती गंभीर

प्रकाश काशीद

परंडा (जि. उस्मानाबाद) - शहरालगत असलेल्या भोत्रा रस्त्यावर सिना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळुमाफिया वाळूचा बेसुमार उपसा करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अंगावर वाळूमाफियाने ट्रॅक्टर घातला. यात श्री. हेळकर गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार आज (ता. 14) पहाटे पाचच्या सुमारास घडला. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत माहिती अशी की, सध्या शहर व तालुका परिसरात असलेल्या नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून वाळूमाफियांकडून बेसुमार अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. यापूर्वी अशा बेकायदा वाहनावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. आज पहाटे बेकायदा वाळूचोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार हेळकर यांनी तलाठी चंद्रकांत कसाब, आशीष ठाकूर, आकाश बाबळे या महसूल कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भोत्रा रस्त्यावर जात असताना अण्णा खडके यांच्या खडी केंद्रावर वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसून आले. कारवाईचा बडगा उगारण्यासाठी तहसीलदार हेळकर हे ट्रॅक्टरजवळ जात वाहनाच्या चावीची मागणी करीत असताना ट्रॅक्टरचालक मयूर बापूसाहेब वाघमारे (रा. माळी गल्ली, परंडा) याने तहसीलदार हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. 

पाठीवरून गेले मोठे चाक
ट्रॅक्टरचे मोठे चाक तहसीलदार हेळकर यांच्या पाठीवरूनच गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बार्शीला हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक रावसाहेब राठोड हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी असलेल्या तहसीलदार हेळकर यांना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

पोलिसांनी ट्रॅक्टरचालक मयूर वाघमारे यास ताब्यात घेतले आहे. अन्य वाळुमाफियांची धरपकड सुरू असल्याने सर्वजण फरार झाले आहेत. घटनेतील बिगर क्रमांकाचा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : २४ तासांच्या आत पुणे शहरात दोन गोळीबाराच्या घटना

SCROLL FOR NEXT