हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने टंचाई काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यांत्रिकी विभागाच्या वतीने १६३ नव्या विंधन विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. आता मान्यता मिळल्यानंतरच या कामांना सुरवात केली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता शिरकाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनेच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - हिंगोलीत ११२ जणांना पालिकेचा दणका...कशासाठी वाचा
आराखडे सादर करण्याच्या सूचना
त्यामुळे सर्व कामे ठप्प पडली आहेत. राज्य शासनाने आता बांधकाम, रस्ते, पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देत ही सर्व कामे लॉकडाउनमध्ये करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार रस्त्याच्या कामाबरोबरच पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाणीटंचाई आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
भीषण पाणीटंचाई सावट
तसेच ज्या गावात पाण्याचे स्रोत नाहीत, अशा ठिकाणी विंधन विहिरींचे प्रस्ताव तातडीने दाखल करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊन कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये असलेली भीषण पाणीटंचाई पाहता यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
चार एजन्सी मार्फत कामे
प्रशासकीय मान्यता मिळताच चार एजन्सी मार्फत नव्याने विंधन विहिरींची कामे सुरू केली जाणार आहेत. आता एप्रिल महिना उलटण्याच्या मार्गावर आला आहे. जिल्ह्यात काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीने पाणीटंचाई प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नळ योजनाही ठरताहेत कुचकामी
जिल्ह्यात काही मोठ्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहेत. मात्र, यातील काही गावांत पूर्ण कार्यक्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. गावात नळ पाणीपुरवठा योजना असल्याने दुसऱ्या योजना घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दुहेरी संकटात ग्रामस्थ अडकत आहेत.
पाणवठे उभारण्याची गरज
जिल्हाभरातील बहुतांश तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. माळरानावरील पाणीसाठेही आटले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी मानवी वस्तींकडेधाव घेत आहेत. मानवी वस्तींकडे आलेल्या वन्य प्राण्यांच्या कळपावर मोकाट कुत्रे तुटून पडत आहेत. यातून वन्यप्राणी जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.