दशक्रिया
दशक्रिया 
मराठवाडा

'दशक्रिया'ला विरोध करणारी याचिका फेटाळली 

आनिल जमधडे

औरंगाबाद : 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी शुक्रवारी (ता. 17) फेटाळून लावली. पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी तसेच संतोष छडीदार, गोवर्धन छडीदार यांनी ही याचिका दाखल केली होती.

ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांचे आहे. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा आणि त्या अनुषंगाने अनेक जुनाट बाबींवर या सिनेमातून परखड भाष्य करण्यात आले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानीकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील श्रीकांत अदवंत यांनी केला.

याचिकाकर्त्यांनी या संदर्भात शिक्षण व  प्रशिक्षण घेतलेले आहे. ते त्यांचे उपजीविकेचे साधन आहे आणि यात आक्षेप घेण्यासारखेही काही नाही. घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहेत. गरुडपुराण, निर्णयसंहिता, धर्मसिंधू, अंत्येष्टी संस्कार आदी ग्रंथांमध्ये याबाबत लिहिलेले आहे. हे थोतांड नसून, हिंदू संस्कृती आणि परंपरेने चालत आलेला महत्वाचा विधी आहे असे अदवंत यांनी खंडपीठात सांगितले. या चित्रपटात असलेले आक्षेपार्ह संवाद, दृश्ये वगळण्यात यावेत आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. सुनावनी नंतर, खंडपीठाने याचिका फेटाळली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT