Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

जिथे काम करीत होता तिथेच ट्रकखाली दबून अभियंत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : काही लोकांना गिफ्ट देण्यासाठी एक अभियंता त्यांच्याच देवळाई चौक परिसरातील गोदामाजवळ आला. तिथे सिमेंटने भरलेला ट्रक रिव्हर्स घेतला जात होता. क्‍लिनर नसल्याने चालकाच्या लक्षात आले नाही अन..ट्रक व भिंतीत दबून अभियंता गतप्राण झाला. ही करुण व हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. 16) सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गणेश तात्याराव ढोले (वय 33, रा. जयभवानीनगर, गल्ली क्रमांक दहा, औरंगाबाद) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते मुळ बीदर, कनार्टक येथील आहेत. ते पत्नी, भाऊ व मुलीसोबत शहरात राहत होते.

गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. देवळाई चौकातील एका इंग्रजी स्कुलमागे त्यांचे कार्यक्षेत्र असून तेथेच गोदाम आहे. व्यवसायाशी संबंधित काही लोकांना गिफ्ट द्यायचे असल्याने ते या गोदामाजवळ सकाळी आले.

ट्रकमध्ये क्‍लिनरही नव्हता

त्यावेळी गोदामात सिमेंट टाकण्यासाठी ट्रक आला. चालकाने गोदामाच्या दिशेने ट्रक रिव्हर्स घेतला. त्यावेळी भिंतीजवळ गणेश ढोले उभे होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये क्‍लिनरही नव्हता. त्यामुळे रिव्हर्स घेताना ट्रक व भिंतीच्या कोंडीत सापडून गणेश ढोले गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्याचे लक्षात येताच ढोले यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी सव्वाअकरानंतर त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. मृत्यूच्या घटनेने ढोल व त्यांच्या मित्र परिवारात हळहळ झाली. एका नाहक चुकीने त्यांचा बळी गेला.

चालकावर गुन्हा 

अपघाताच्या घटनेनंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करुन पंचनामा केला. गणेश ढोले यांच्या मृत्यूप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: 'मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ अडचणीचे'; दोन प्रकरणांत सर्वोच्च, उच्च न्यायालयाची नकारघंटा

Mitchell Starc Retirement: मिचेल स्टार्कने अचानक जाहीर केली निवृत्ती; म्हणाला, कसोटी अन् वन डे क्रिकेट...

Pune Flight Landing: 'पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग'; कॉकपिटमध्ये हवेचा दाब कमी झाल्याने निर्णय

कारला पिकअप घासली, मराठा तरुणांना पनवेलमध्ये कार चालकाची मारहाण; पाच जणांना अटक

Kolhapur Politics : वाठारकरांच्या एकजुटीचा 'विजय', गावची जमीन समन्वयाने गावाला मिळणार परत; विजयसिंह मानेंनी जमीन देण्याचे केले कबूल

SCROLL FOR NEXT