संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

ते कोरोना संशयित इथेच राहतात का...? चुकीच्या पत्त्यांमुळे प्रशासनाची होतेय धावपळ

मनोज साखरे

औरंगाबाद - कोरोना चाचणीवेळी पत्ता देण्यात झालेली चूक असो वा जाणीवपूर्वक खरा पत्ता देणे टाळणे असो यामुळे नागरिक व प्रशासनचीही कोंडी होत आहे. कोविडबाधित रुग्णांच्या चुकीच्या पत्त्यांमुळे परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण नसतानाही स्थानिक धास्तावल्याचे व त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची सद्यःस्थिती आहे. शहरात सुरवातीला कोविडचे रुग्ण आढळत असल्यापासून नागरिकांत बरीच धास्ती होती. हळूहळू ही भीती कमी होत आहे; परंतु आजही कोणत्या भागात रुग्ण आढळले, त्या भागाचे आणि आपल्या परिसराचे अंतर, आपला येणारा संबंध व इतर काही बाबी काळजीपोटी बहुतांश नागरिक आपापल्या पातळीवर तपासतात. सुरक्षिततेसाठी किंवा धास्ती अथवा माहिती जाणून घेण्याची सवय यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा बहुतांशजण करतात. परिसरानुसार उपाययोजनाही ते करीत असतात; परंतु अलीकडे बाधित रुग्ण व त्यांच्या पत्त्यातच गडबड दिसून येत असल्याची बाब पुढे आली आहे. 

एक उदाहरण
दशमेशनगर येथील सातजण सहा जूनला सकाळच्या अहवालात कोविडबाधित असल्याचे समोर आले. मुळात ते या भागातील रहिवासीच नसल्याचे स्थानिक नागरिक व माजी नगरसेवक गिरिजाराम हळनोर यांनी सांगितले. पाच जूनलाही एका कोविडबाधित रुग्णाच्या बाबतीत असाच प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

नागरिकांसमोरच्या अडचणी 
बाधित रुग्ण रहिवासी नसतानाही आपल्या भागातीलच आहे असा 
पत्ता आल्याचा फटका त्या भागातील नागरिकांना बसतो. नागरिकांत घबराट निर्माण होते. मानसिक त्रासही होते. चुकीच्या पत्त्यामुळे बाधितांची त्या भागात संख्येत भर पडून परिसर कंटेनमेंट झोन होतो. यामुळे नोकरीच्या ठिकाणी जाण्यास अडचणी. पास मिळण्याबाबत अनिश्‍चितता निर्माण होते. 

ट्रेसिंगमध्ये अडथळे 

  • चुकीच्या पत्त्यांमुळे रुग्णांचे घर शोधणे कठीण जाते. 
  • चुकीच्या संपर्क क्रमांकामुळे रुग्णांना शोधणे त्रासदायक. 
  • सॅनिटायझेशन, काँटॅक्ट ट्रेसिंगला समस्या. 
  • डिटेक्शन व स्वॅब घेण्यास अडचणी. 
  • खरा डाटा तयार होत नाही. 

हव्यात या उपाययोजना 

  • रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी अद्ययावत माहिती, पत्ते द्यावेत. 
  • प्रशासनाने रुग्णांची माहिती पडताळून घ्यावी. 
  • केवळ आधारकार्डवरील माहितीवरून नोंदणी करू नये. 
  • रुग्ण व इतर नागरिकांच्या माहितीची सत्यता पडताळावी. 

प्रशासनाच्या अहवालानुसार, दशमेशनगर भागात पाच जुलैला एक व सहा जुलैला सात रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले; परंतु हे सर्व रुग्ण दशमेशनगरचे रहिवासी नाहीत. याचा मानसिक त्रास आमच्यासारख्या स्थानिकांना होतो. नागरिकही गांगरून जातात. 
गिरिजाराम हळनोर, माजी नगरसेवक. 

ट्रेसिंग करणे सोपे नाही. चुकीचा पत्ता आणि संपर्क क्रमांकाचा त्रास होतो. आमची टीम चांगली आहे. सोबतीला सायबर पोलिसांचीही साथ आहे. 
पुष्कर शिवम्, प्रभारी प्रमुख, टास्क फोर्स 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT