20coronavirus_105_0 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरातील हॉटेल साडेदहानंतर बंद, ग्रामीण भागातही संचारबंदी

माधव इतबारे

औरंगाबाद : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल रात्री १०.३० पूर्वी बंद झाले नाहीत तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. ग्रामीण भागातही पाच जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी असेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २२) जाहीर केले.


पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण म्हणाले, की ब्रिटनमध्ये कोरोना वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री १०.३० नंतर शहरात जे हॉटेल, आस्थापना, दुकाने सुरू राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शहराप्रमाणेच ग्रामीण पोलीस हद्दीतही संचारबंदी राहणार असल्याने ढाबे, हॉटेल्स यावर देखील प्रशासनाची नजर असेल. झालर क्षेत्र आणि ग्रामीण हद्दीतील ढाबे, हॉटेल्स या संचारबंदीच्या काळात बंद असतील.

कलम १४४ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुणावरही कारवाई करण्याची वेळ येऊ, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले, की रात्रीची संचारबंदी १५ दिवसांसाठी आहे. याकाळात म्हणजेच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे.


हे राहणार सुरू
रात्रीच्या संचारबंदीच्या काळात आरोग्य सेवा, मेडिकल दुकाने, रात्रपाळीतील उद्योग, मजूर, हमाल, अत्यावश्यक सेवा, पेट्रोल पंप, कॉल सेंटर, दळणवळण, दूरसंचार, पाणीपुरवठा यंत्रणा, बस, खासगी बस सुरू राहणार आहेत. तसेच या काळात उद्योग, जीवनावश्यक वस्तुंची माल वाहतूक सुरू राहील, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.



ओळखपत्र आवश्‍यक
संचारबंदी कालावधीत रात्री बाहेर पडणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, कारखान्यातील कर्मचारी, आवश्यक आस्थापनांवरील अधिकारी, कर्मचारी, मजूर यांना संचारबंदी काळात सूट देण्यात येत आहे. मात्र, संबंधितांना ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्याऐवजी वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी ओळखपत्रही सोबत बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT