Antarwali Sarathi Village Maratha Community Jalna Police esakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna News : पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण शांतता; डोक्याला पट्टी बांधून आंदोलकांचा उपोषणात सहभाग

राज्य शासनाने आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही - मनोज जरांगे

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली.

वडीगोद्री (जालना) : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (शनिवार, ता. दोन) उपोषण (Maratha Andolan) सुरू आहे. राज्य शासनाने आरक्षण (Jalna Maratha Reservation) जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार मुख्य उपोषणकर्ते मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

आज विविध राजकीय नेते भेट देणार आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आज भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला.

त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. शिवाय, पोलिसांनी प्लास्टिक बुलेटचा गोळीबारही केला. या घटनेचे संपूर्ण राज्यात प्रसाद उमटले असून शनिवारी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली.

तर, आज शनिवारी (ता. दोन) सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी ही उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील शनिवारी दुपारी आंदोलन भेट देणार आहेत.

दरम्यान, शासनाने आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे, असे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध जरांगे यांनी यावेळी केला. दरम्यान, उपोषण स्थळी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT