Accident News 
छत्रपती संभाजीनगर

जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या भाविकांवर काळ आला होता पण वेळ नाही

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या भाविकांची मिनी बस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली. या अपघातात बस अर्धी कापली गेल्याने ११ जण जखमी झाले. त्यातील तीन जण गंभीर आहेत. हा भीषण अपघात औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव (बंगला) येथे शुक्रवारी (ता.पाच) पहाटे तीनच्या सुमारास झाला.


नागपूर येथील हर्षदा ठाकरे (१०), बंडू ठाकरे (४१), रामभाऊ ठाकरे (७५), स्नेहा गावंडे (३०), अश्विन गावंडे (४०), माधव गावंडे (५०), विकास म्हस्के (५०) असे १२ भाविक जेजुरीहून खंडेरायाचे दर्शन घेऊन मिनी बसमधून (एमएच-४९ जे, ०६३४)  परत नागपूरकडे जात होते. त्यांची बस औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव (बंगला) जवळ येताच रोडवरच उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच-४०, बीजी-६६७७) पाठीमागून जोरात धडकली.

या अपघातात बस कंटेनरमध्ये घुसली. त्यामुळे ती अर्धी कापली गेली. या अपघातात हर्षदा ठाकरे, बंडू ठाकरे, रामभाऊ ठाकरे, स्नेहा गावंडे, अश्विन गावंडे, माधव गावंडे, विकास म्हस्के जखमी झाले.  उर्वरित किरकोळ जखमी आहे. जखमींना पोलिस व नागरिकांनी बाहेर काढून उपचारार्थ दाखल केले. जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दहेगाव बंगल्याजवळ कंटेनर उभा होता. या उभ्या कंटेनरला रिफ्लेक्टर किंवा कंटेनर नादुरुस्त असल्याचा काहीच दिशादर्शक फलक नव्हते. शिवाय पहाटेची वेळ होती. भरधाव असलेल्या मिनी बस चालकाला अंदाज न आल्याने बस त्या कंटेनरला धडकून हा भीषण अपघात झाला.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT