Aurangabad Corona update 10th Patient Dead In Ghati Hospital 
छत्रपती संभाजीनगर

Breaking : औरंगाबादमध्ये कोरोनाचा दहावा बळी, रुग्ण संख्या २८३ वर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : येथील घाटी रुग्णालयात रविवारी (ता. तीन) दुपारी दीड वाजता दाखल झालेल्या एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती ‘घाटी’च्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी दिली. मृत रुग्ण देवळाई-सातारा परिसरातील रहिवासी असून, रात्री दहा वाजता त्यांच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांना दमा, खोकला, मधुमेह, चक्कर येणे आदी आजार होते. 

या रुग्णाला रविवारी दुपारी गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वाशोच्छासह उपचार सुरू होते. तीन वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रात्री दहा वाजचा त्यांच्या कोवीड-१९ च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तासभरात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅट्रल न्युमोनिया डयू टू कोव्हीड-१९ इन केस  विथ डायबिटीस मेलआयटस हा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहरात कोरोनाग्रस्तांचा हा दहावा मृत्यू असून, रविवारपर्यंत एकूण रुग्ण संख्या २८३ एवढी होती. त्यापैकी २५ रुग्ण बरे झाल्याने त्यांची सुटी झाली.  

रविवारची रुग्ण संख्या

औरंगाबादेत शनिवारी (ता. दोन) कोरोनाबाधितांची संख्या २५७ होती. त्यात रविवारी (ता. तीन) २६ रुग्णांची भर पडली. सकाळच्या सत्रात सतरा रुग्णांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला. यात १६ मुकुंदवाडीतील व एक बायजीपुरा येथील आहे. सायंकाळच्या सत्रात आठ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात गुलाबवाडी येथील तीन व संजयनगर-मुकुंदवाडी येथील पाच जणांचा समावेश आहे. रात्री दहा वाजता सातारा-देवराई परिसरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तासभरात त्यांचा मृत्यू झाला. 

  • ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
  • १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
  • १८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २२ एप्रिलला हिलाल कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू. 
  • २७ एप्रिलला किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २८ एप्रिललाही किलेअर्क येथील ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • १ मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू. 
  • आणि
  • २ मे नूर कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
  • ३ मे सातारा-देवराई परिसरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT