corona death.jpg 
छत्रपती संभाजीनगर

Corona : औरंगाबादेत चोवीस तासात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू,आतापर्यंत ३९० जणांचा बळी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दहा हजाराचा टप्पा पार झाला आहे. याच बरोबर कोरोनामुळे मृत्यची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासात खाजगी रुग्णालयात दोन, तर घाटी रुग्णालयात तीन असे पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९० जणांचा  कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाच्या अधिष्ठातातर्फे देण्यात आली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
शनिवारी (ता.१८) जिल्ह्यात सकाळी ८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण  बाधितांची संख्या  १० हजार १६६ वर पोहोचली आहे. , त्यापैकी ५८६१ बरे झाले, ३९० जणांचा मृत्यू झाला. तर ३९१८ जणांवर उपचार सुरु आहेत. 

शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय व जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर घाटी रुग्णालयात चिकलठाणा येथील चाळीस वर्षे रुग्णास शुक्रवारी (ता.१७) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. व सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हर्सूल सावंगी येथील ६६ वर्षे पुरुष रुग्णास नऊ जुलैला घाटीत दाखल करण्यात आले होते. दहा तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर  शुक्रवारी (ता.१७) त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. किल्लेअर्क, भोईवाडा येथील ६२ वर्षीय महिलेला आठ जुलैला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज पर्यंत घाटी रुग्णालयात कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २९७ वर गेली आहे, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

कोरोना मीटर

  • बरे झालेले-५८६१
  • उपचार सुरू -३९१८
  • मृत्यू------३९०
  • एकूण रुग्ण- १०१६६

(संपादन : प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT: मोदींसमोर 'चॅट जीपीटी'चा मालकही गोंधळला! प्रतिस्पर्ध्याचा हात हातात का घेतला नाही? सांगितलं कारण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ३२९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर चार कोटी जमा; आणखी ८६ कोटींची गरज, काय आहे याेजना?

Latest Marathi News Live Update : शिवजयंती मिरवणुकीत विना परवाना डीजेवरून वाद, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

MP Supriya Sule : रोहित पवारांच्या संरक्षणात वाढ करावी; खासदार सुप्रिया सुळे करणार राज्य सरकारकडे विनंती

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शादाब खान 'तोंडाला लगाम लाव'; ऑल राऊडंरल मिळाली धमकी; माजी खेळाडूंवर केली होती टीका...

SCROLL FOR NEXT