AMC Aurangabad
AMC Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे ‘जैसे थे’चे आदेश

सुषेन जाधव

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या विशेष अनुमती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश देत पुढील आदेशापर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. 
महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप सादर केले होते. सदर आक्षेपांवर साखर आयुक्त सौरभ राव यांच्या समितीने सुनावणी घेतली.

त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर खंडपीठासमोर समीर राजूरकर, अनिल विधाते, किशोर तुळशीबागवाले, नंदू गवळी, दीक्षित यांनी याचिका सादर केल्या होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सदर याचिका फेटाळल्यामुळे याचिकाकर्ते समीर राजूरकर व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका सादर केली होती. 

म्हणणे ऐकले, पण निर्णय दिलाच नाही 
प्रारुप प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणावर गोपनीयतेचा भंग करून हवी तशी प्रभागरचना प्रभावशाली राजकीय नेत्यांनी केली आहे; आयोगाने निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता एखादा प्रभाग आरक्षित अथवा अनारक्षित करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या प्रभाग रचना केलेली आहे; ज्या अधिकाऱ्याने आक्षेपांवर म्हणणे ऐकले. 

त्यावर निर्णय न घेता राज्य निवडणूक आयुक्तांनी निर्णय घेतला आहे, इत्यादी मुद्दे सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आले आहेत. सदर याचिकेत राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग, औरंगाबाद महापालिका यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ डी. एस. कामत, ॲड. देवदत्त पी. पालोदकर, ॲड. शशीभूषण आडगावकर यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT