Aurangabad mahapalika.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांनो सावधान ! विनामास्क महापालिकेत आलात तर भरावा लागेल एवढा दंड ! 

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना शहरातील नागरिक मात्र गांभीर्याने घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच महापालिका मुख्यालयात कोणी विनामास्क आले तर त्याला पाचशे रुपये दंड लावण्याचे आदेश प्रशासकांनी काढले आहेत. शुक्रवारपासून (ता.११) या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर एवढेच सध्यातरी पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार शासन, प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, नागरिक मात्र मनावर घेण्यास तयार नाहीत. लॉकडाउन शिथिल झाल्यापासून शहरात राजरोसपणे नागरिक मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. 

दरम्यान, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा क्रमांक-३ या इमारतींत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी विनामास्क प्रवेश करू नये, अन्यथा ५०० रुपये दंड लावला जाईल, असा इशारा दिला आहे.

तसेच दोन्ही इमारतींच्या प्रवेशद्वारावर थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केल्याशिवाय प्रवेश करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. थर्मलगन-ऑक्सिमीटरने तपासणी न करता कोणी महापालिकेत आले तर गस्तीवर असणाऱ्या माजी सैनिकांनी त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT