sunil chvahan.jpg 
छत्रपती संभाजीनगर

मनोधैर्य वाढविण्यासाठी १३ ऑक्टाेंबरला औरंगाबादेत ‘मन मे है विश्वास’ ! 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनावर मात करून त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांचे आपण कोरोनावर मात करू हा विश्‍वास जागवण्यासाठी , मनोधैर्य वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘मन मे है विश्वास’हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. कोरोनामूक्त झालेल्यांच्या मदतीने हा उपक्रम मंगळवारी (ता.१३ ) सकाळी १० वाजता राबवण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
या उपक्रमाच्या नियोजनाबाबत बुधवारी (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी उपक्रम  यशस्वीतेच्या दृष्टीने सूचना दिल्या. कोरोना विषयीची भीती दूर करून कोरोनातून लवकर बरे होण्यासाठीचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी ‘ मन मे है विश्वास ’  या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याबाबत निर्देश दिले.

वेळीच योग्य ती खबरदारी व औषधोपचार घेत अनेक कोरोना  योद्ध्यांनी कोरोना संसर्गावर यशस्वी मात करून जगण्याचा विश्वास निर्माण केला आहे.  कोरोनातून बरे झालेल्यांनी प्रेरणादायी आणि सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवण्याच्या अढळ विश्वासाने या आजारावर मात केली आहे. या मधील काही प्रातिनिधीक व्यक्तींचा सन्मान कोरोनायोध्दा म्हणून ‘ मन मे है विश्वास ’ या उपक्रमात करण्यात येणार आहे. मन मे है विश्वास या गीतावर चित्रीकरण करण्यात येणार आहे.  हे चित्रीकरण समाज माध्यमे, प्रसार माध्यमांव्‍दारे प्रसारित करण्यात येणार आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT