electricity.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : वीज जाते आणि येते; त्यावेळी नेमके काय घडते? 

अनिल जमधडे

औरंगाबाद : पावसाळ्यात रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. तेव्हा कर्मचाऱ्यांना पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढून दुरुस्ती करावी लागते. 

पावसाळ्याच्या सुरवातीला वादळवारे व आकाशाच्या विजेतील कडकडाट प्रत्येकाने अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यांमधून घरात आलेली वीज असो; की आकाशात लखलखणारी वीज, दोन्हींमध्ये प्रचंड ऊर्जा असते. उच्चदाबामुळे विद्युत उपकरणे जळण्याची शक्यता असते; मात्र दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. म्हणूनच विद्युत उपकरणे सुरक्षित राहतात; पण त्यासाठी काही काळ काळोख सहन करावा लागतो. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
हानी टाळण्यासाठी यंत्रणा 
वीज खांबात विद्युत प्रवाह उतरू नये, यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर खांबावर बसविलेले असतात. बहुधा ते विद्युतप्रवाहामुळे गरम होतात. त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो. 

 
बिघाड शोधणे जिकिरीचे 
वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा पुन्हा फीडर सुरू केला जातो; पण फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे निश्चित होते. त्यानंतर ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता कर्मचारी शोधमोहीम हाती घेतात. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड लवकर सापडतो. 

वीजताराही तुटतात 
पावसाळ्यात बऱ्याच वेळा वादळामुळे विजेच्या तारा तुटतात. अनेकवेळा वीजतारांवर झाडाच्या फांद्या तुटून पडलेल्या असतात. त्यामुळे सर्किट ब्रेक होऊन वीजपुरवठा खंडित होतो. पाऊस सुरू असेल तर कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होतो. 

केव्हा ट्रान्स्फॉर्मर, तर केव्हा केबल 
अनेकवेळा ट्रान्स्फॉर्मर फेल होतो, तर अनेकवेळा केबल बस्ट होते. ट्रान्स्फॉर्मर फेल झाला तर नवीन उपलब्ध झाल्याशिवाय काम करता येत नाही. यासाठी कधीकधी मोठा वेळ म्हणजे दिवसभरही लागतो. कुठे अंडरग्राउंड केबल बस्ट झाली तरीही फॉल्ट शोधण्यात प्रचंड वेळ जातो. हेही वीजपुरवठ्याला विलंब होण्याचे प्रमुख कारण आहे. 

इथे साधा संपर्क 
वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. त्यासाठी महावितरणच्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल-फ्री क्रमांक आहेत; तसेच आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिसकॉल द्यावा अथवा NOPOWER <ग्राहक क्रमांक> हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवावा. महावितरणच्या मोबाईल अॉपवरुन ग्राहक माहिती देऊ शकतात; तसेच स्थानिक नियंत्रण कक्षाच्या ७०६६०४२४१०- ७०६६०४२४१२ (औरंगाबाद शहर मंडल), ७८७५७५६६५२ (औरंगाबाद ग्रामीण मंडल) व ७८७५७६४१४४ (जालना मंडल) या क्रमांकांवर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदविता येते. 

अशी घ्यावी काळजी 

  • घरात आरसीसीबी (रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर) आवश्‍यक आहे. 
  • अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी. 
  • वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी. 
  • वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी. 
  • विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत. 
  • वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा. 
  • विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणला माहिती द्यावी. 

महावितरणचे कर्मचारी ऊन, वारा, पाऊस वा अंधाराची पर्वा न करता दुरुस्तीसाठी कामावर हजर असतात. कधीकधी बंद वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड लवकर सापडतो. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच तंत्रज्ञाला खांबावर चढावे लागते. त्यामुळेच नागरिकांनी लाइट गेल्यानंतर संयम बाळगून सहकार्य केले पाहिजे. 
ज्ञानेश्‍वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Ambegaon gas distribution: ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम: आंबेगाव तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर अवसरी खुर्दमध्ये सव्वा महिन्यानंतर गॅस टाक्यांचे वितरण सुरू

SCROLL FOR NEXT