Corona Vaccination Shortage In Waluj Aurangabad
Corona Vaccination Shortage In Waluj Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

वाळूज परिसरात कोरोना लसींचा तुटवडा, नागरिकांमध्ये नाराजी

रामराव भराड

वाळूज(जि.औरंगाबाद) : वाळूज परिसरातील प्राथमिक केंद्र वाळूज, प्राथमिक उपकेंद्र रांजणगाव (शेणपुंजी) व परिसरातील कमळापूर, नायगाव -बकवालनगर, जोगेश्वरी, रामराई व बजाजनगर या परिसरात कोविड लसीचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी रोजगार बुडवून आलेल्यांना शनिवारी (ता.दहा) रोजी परत जावे लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली. प्राथमिक आरोग्य केंद्र जिकठाण अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज व प्राथमिक उपकेंद्र रांजणगाव (शेणपुंजी) यास कमळापूर, नायगाव -बकवालनगर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे.

वाळूज येथील लसीकरण केंद्रावर आज पर्यंत १ हजार ४९१ जणांना लस देण्यात आली. तर रांजणगाव (शेणपुंजी) येथील उपकेंद्रावर १ हजार २३८, नायगाव नायगाव- बकवालनगर येथे १३५ व कमळापूर येथे १८ जणांना कोविडची लस देण्यात आली. लस उपलब्ध झाल्याने ४५ वर्षावरील सर्व कामगार व नागरिक लस घेण्यासाठी प्राधान्य देत आहे. शनिवारी लस मिळेल म्हणून अनेक कामगार व नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली. मात्र लस मिळाली नाही. 


रांजणगाव येथील उपकेंद्रात नेमणूक असलेल्या डॉ. मोमीन हुमेरा यांची तालुका आरोग्य अधिकारी यांनी तोडी आदेश देऊन आडुळ येथे केलेली बदली रद्द करुन त्यांना रांजणगाव येथे रुजू करावे. तसेच लसीचा साठा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा. अशी मागणी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT