corona virus image.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अबब..! लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादेत दहा हजार टेस्ट, तर ८५ व्यापाऱ्यांना कोरोना..

माधव इतबारे

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. १८) महापालिकेने शहरात दिवसभरात तब्बल नऊ हजार ९०३ लोकांच्या कोरोना तपासण्या केल्या. त्यापैकी २५२ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात ८५ व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी महापालिकेने शहरात १० जुलैपासून १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. शनिवारी लाँकडानचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महापालिकेने शहरात जागोजागी अँटिजेन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मोहीम राबविली.

 भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, अंडी, दूध विक्रेत्यांना रविवारपासून (ता.१९) दुकाने उघडण्यासाठी कोरोना तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासण्यासाठी  शहरात २२ ठिकाणी शिबिर घेण्यात आले, त्यात दिवसभरात ४२७४ विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातील ८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले.

यामध्ये औरंगपुरा येथील नाथ सुपर मार्केट मधील शिबिरात सर्वाधिक पंचवीस विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापाठोपाठ रामनगर येथे १४ आणि संभाजी कॉलनी येथे १४ विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच महापालिकेने शहरातील ६ एन्ट्री पाँईंट आणि इतर काही वसाहतींमध्ये सामान्य नागरिकांसाठीही तपासणी मोहीम राबविली. त्यात पाच हजार ६२९ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १६७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांनाही महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले.

दोन टप्प्यात होणार व्यापारी, विक्रेत्यांची कोरोना चाचणी

पहिला टप्पा १८ ते २५, दुसरा टप्पा २५ ते ३१ जुलै असा असेल. पहिल्या टप्प्यात व्यापार्यांना दुकाने उघडता येतील. दुसऱ्या टप्प्यानंतर ज्यांच्याकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसेल, त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत, असे प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

यांची होणार चाचणी... 
किराणा व्यापारी, भाजीपाला-फळ विक्रेते, दुध विक्रेते, चिकन-मटण, मासे, अंडी विक्रेते, बेकरी उत्पादक, विक्रेते, केश कर्तणालये चालक. उद्या दुपारी दोन वाजेपासून चाचण्यांना सुरुवात होणार. त्यासाठी १५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सात ते रात्री सात या वेळेत दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे मात्र आयुक्तांनी काढलेल्या आदेशात दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेस सुरू राहतील असे नमूद केले आहे.

(संपादन : प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

Latest Marathi News Live Update : अफगाणिस्तानात ६.३ तीव्रतेचा भूकंप, ७ जणांचा मृत्यू, भारतापर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के

Success Story: कोमल ढवळेचा ‘एमपीएससी’मध्ये चौथ्या प्रयत्नात पराक्रम; राज्यात मिळवला सातवा क्रमांक

Sharad Lad: पदवीधर उमेदवारीचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय : भूमिका क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

SCROLL FOR NEXT