लाईट.jpg 
छत्रपती संभाजीनगर

खुशखबर ! वीज पुरवठा खंडीत झाला तरीही तुमच्या घरातली लाईट नाही जाणार ! 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद :  वीज यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीच्या काळापर्यत ग्राहकांना पर्यायी वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची दुरुस्ती होईपर्यंत ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येणार नाही. ग्राहकांचा पुरवठा खंडीत ठेवून दुरुस्ती ही संकल्पना मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याची माहिती अभियंता भुजंग खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
 
शहरातील प्रत्येक सबस्टेशनला विद्युत पुरवठ्यासाठी दोन सोर्स तयार करण्यात येत आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याचा नेम नसतो. महावितरणचे कर्मचारी दुरस्तीच्या कामात व्यस्त असताना नागरीकांचे फोन वीज केंव्हा येणार यासाठी सुरु होतात. त्यामुळे दुरुस्ती कामात व्यत्यय तर येतोच मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरीकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. ही पद्धत वर्षानुवर्ष सुरु असलेली पद्धत आता मोडीत काढण्यात येणार असल्याचे श्री. खंदारे यांनी सांगितले. दुरुस्तीच्या वेळेत पर्यायी वीज पुरवठा करता यावा, त्यासाठी तशी यंत्रणा कार्यन्वित करण्याच्या दृष्टीने शहरात सर्वेक्षण करून दोन महिन्यांत डीपीआर तयार करणार आहे.

वीज सक्षमीकरण, ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, वीज गळती व चोरी कमी करण्याचे उद्दिष्टे निश्चित केले आहे. यासाठी शहर व परिमंडळात सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या समजा वाळुजला बिघाड झाला तर छावणी आणि समाधान कॉलनीचा वीज पुरवठा बंद होतो. त्यावेळी दुरुस्ती करताना त्याचे कारण शोधणे दुरुस्ती करण्यासाठी मोठा वेळ जातो. त्या काळात तीनही विभागाचा वीज पुरवठा बंद ठेवावा लागतो. अशीच परिस्थिती शहराच्या वेगवेगळ्या भागाची असते. यापुढे मात्र असे होणार नाही. 

प्रत्येक सबस्टेशनला पर्यायी वीज पुरवठा तयार ठेवल्याने ग्राहकांना अंधारात बसण्याची वेळ येणार नाही आणि महावितरणच्या कामातही व्यत्यय येणार नाही. मात्र या नव्या यंत्रणेसाठी विद्युत खांब उभे करणे, वाहिन्या जोडणे, भूमिगत वाहिन्या टाकणे, रोहित्रांची संख्या वाढवणे, अशा विविध कामांसाठी दोन महिन्यांत डीपीआर तयार होईल असे खंदारे यांनी स्पष्ट केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांची उपस्थिती होती.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT