औरंगाबाद महापालिका
औरंगाबाद महापालिका 
छत्रपती संभाजीनगर

मंजुरीविना सफारी पार्कचे काम, प्रस्ताव दीड वर्षापासून पडून

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Zoo) प्राण्यांना असलेल्या सोयी-सुविधांची केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे. यावेळी काही बाबींवर पथकाने नाराजी व्यक्त केली. असे असतानाच महापालिकेने प्राणिसंग्रहालय मिटमिटा भागात स्थलांतरित करण्यासाठी सुरू केलेल्या सफारी पार्कचे काम केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीविनाच सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान प्राणिसंग्रहालयाला देण्यात आलेली मुदतवाढीची मुदतही केव्हाच संपली आहे. ही मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेने मिटमिटा भागात शंभर एकर जागेवर सफारी पार्क विकसित करण्याचे काम स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत (Smart City Scheme) हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय सफारी पार्कमध्ये (Safari Park) स्थलांतरित केले जाणार आहे.

महापालिका सफारी पार्क विकसित करीत असल्याच्या अटीवर प्राणिसंग्रहालयाला एका वर्षाची मुदतवाढ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिली होती. त्यानुसार महापालिकेने सफारी पार्कचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राधिकरणाला पाठविला आहे. दीड वर्षे उलटले अद्याप प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. असे असताना दुसरीकडे महापालिकेने सफारी पार्कमध्ये संरक्षण भिंत बांधणे व सपाटीकरणाचा काम सुरू केले आहे. आता अंतर्गत कामाची निविदा काढली जाणार आहे. ही मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुदतवाढीसाठी १० हजारांचे शुल्क

प्राणिसंग्रहालयाच्या मंजुरीला मुदतवाढ मिळावी यासाठी प्राधिकरणाने १० हजारांचे शुल्क भरण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेने शुल्क देखील जमा केले आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT