Aurangabad amc news
Aurangabad amc news 
छत्रपती संभाजीनगर

पैशांसाठी रोखले अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेने बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली असली तरी स्मशानजोगी वारंवार अडवणूक करीत आहेत. एन-११ येथील स्मशानभूमीत पैशांसाठी स्मशानजोगीने अर्धा तास अंत्यसंस्कार रोखल्याचे गुरुवारी (ता. नऊ) उघडकीस आले. शेवटी चार हजार रुपये घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वानखेडेनगर येथील एका कुटुंबातील व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. या कुटुंबाने नगरसेवकाचे पत्र घेऊन मोफत अंत्यसंस्काराची पावती घेतली. अंत्ययात्रा स्मशानात गेल्यानंतर येथील स्माशनजोगीने मोफत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. नागरिकांनी महापालिकेची योजना आहे, तुम्ही पैसे कसे काय मागता, असा आक्षेप घेऊन महापौर, अधिकाऱ्यांकडे तक्रार करू असे सांगितले. त्यावर कुणाला फोन करायचा तो करा, मोफत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भाषा स्मशानजोगीने वापरली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

काहींनी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांना बोलावून घेतले. त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तीन महिन्यांपासून पगार नाही. अंत्यसंस्कारचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. लाकडे आणण्यासाठी पैसे नाहीत, अशी कारणे स्मशानजोग्याने दिली. वानखेडे यांनी उपायुक्त सुमंत मोरे, करणसिंग चव्हाण आणि आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना संपर्क साधला. सर्वांनी पावती असल्यास पैसे द्यायची गरज नाही, असे सांगितले. या प्रकारात अर्धातास गेला. शेवटी मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठीची पावती असूनही ‘लाकडाचे व इतर पैसे म्हणून मी चार हजार रुपये घेत आहे’, असे स्मशानजोगीकडून लिहून घेत अंत्यसंस्कार करण्यात आले. 


एन-११ येथील स्मशानजोगी सुभाष गायकवाड नियमित अडवणूक करतात. त्यामुळे अनेकांची दु:खाच्या प्रसंगी अडचण होते. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. 
राजगौरव वानखेडे, नगरसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT