teacher.jpg 
छत्रपती संभाजीनगर

शिक्षकदिनीच शिक्षकांचा झाला हिरमोड, का ते वाचा सविस्तर !  

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतर्फे प्रतिवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वर्ष २०२० मधील जिल्ह्यातील एकूण १७ शिक्षकांची निवड करण्यात आली असून विशेष प्रोस्साहनपर ४ शिक्षकांची निवड झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा मीना रामराव शेळके तसेच शिक्षण समितीचे सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी शुक्रवारी (ता.०४) पत्रकारांना दिली. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुराजप्रसाद जैस्वाल तसेच अध्यक्षांचे स्वीय सहायक प्रदीप राठोड, रविंद्र देवढे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

परंतु विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप स्वाक्षरी झाली नसल्याने पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे मात्र रात्री उशिरापर्यंत कळाली नाही. कदाचित शनिवारी (ता.०५) यावर स्वाक्षरी झाल्यावरच पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे अशी महिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी "सकाळ'' शी बोलतांना दिली. 

विशेष बहुमानाचा समजल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून एकूण ३६ शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. यामध्ये नऊ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे १६, माध्यमिक शिक्षकांचे १५ व विशेष शिक्षक ४ असे एकुण ३६ शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राथमिक, माध्यमिक व विषेश शिक्षक गटातील पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छानणी करण्यासाठी निवड समितीची बैठक सोमवारी (ता. ३१) जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. निवड केलेल्या शिक्षकांची यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे परंतु त्यावर अद्याप विभागीय आयुक्तांची स्वाक्षरी झाली नाही. दरम्यान एका मंत्री महोदयांच्या बैठकीत श्री. केंद्रेकर व्यस्त असल्याने रात्री उशिरा पर्यंत संचिकेवर स्वाक्षरी होऊ शकली नाही. 

राष्ट्रीय दुखवटा असल्याने पुरस्कार वितरण नंतर : सुराजप्रसाद जैस्वाल 
जिल्हा शिक्षण पुरस्कारासाठी प्राथमिक ९, माध्यमिक ७, विशेष १ आणि विशेष सन्मान पुरस्कारामध्ये ३ प्राथमिक व १ माध्यमिक शिक्षकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधनामुळे सध्या सोमवार (ता.०७) पर्यंत राष्ट्रीय दुखवटा असल्याने तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शहरातील कलम १४४ लक्षात घेता पुरस्कार वितरण सोहळा यथावकाश घेतला जाईल असे यावेळी शिक्षणाधिकारी सुराजप्रसाद जैस्वाल यांनी "सकाळ'' शी बोलतांना सांगितले. 
 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT