maratha kranti morcha.jpg 
छत्रपती संभाजीनगर

परिवहनची सोडून इतर कोणतीही नोकरी द्या...

अतुल पाटील

औरंगाबाद : घोषणा करायची होती तर, आंदोलन का मोडीत काढले? तसेच एसटी महामंडळ आधीच डबघाईला आले आहे. आगीतून उठून फुपुटात पडण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आम्हाला परिवहनऐवजी दुसरीकडे कुठल्याही खात्यात नोकरी द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या परभणीतील ज्ञानेश्वर लेवडे यांचे भाऊ बाळकृष्ण लेवडे यांनी केली आहे. औरंगाबादेत गुरुवारी (ता. १३) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्य सरकारने काल ‘त्या’ ४२ जणांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये आणि एकास परिवहन खात्यात नोकरी देण्याची घोषणा केली आहे. त्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील, आप्पासाहेब कुढेकर यांनी ‘‘मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटूंबियांना आठ दिवसात दहा लाख रुपये द्यावेत, तसेच एक महिन्याच्या आत नोकरीत सामावून घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा दिला आहे. 

‘‘मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या मागणीला यश मिळाले आहे मात्र, अभिनंदन करणार नाही. आंदोलन केल्यानंतरच घोषणा का करता? तुम्हाला स्वतःहून काही करता येत नाही का? बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना घेऊन बसलो, त्यामुळेच सरकारला घोषणा करणे भाग पडले आहे. एक महिन्याच्या आत घोषणेची अंमलबजावणी करावी. अल्टिमेटम नाही पाळल्यास, पुढचे आंदोलन थेट मातोश्रीच्या बाहेरच करण्यात येईल.’’ असा इशारा देण्यात आला आहे. 

बलिदान दिलेल्या औरंगाबादच्या प्रमोद मोरे यांच्या आई विजयमाला होरे म्हणाल्या, `‘लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. याआधी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलली आहे. याचे पुरावे आहेत, त्यांनी मदतीचे आश्‍वासन दिले होते. आम्हाला वेळेवर मदत देऊन मातोश्रीवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये. हीच विनंती आहे.’’ 

ठोक मोर्चातर्फे नुकतेच कायगाव टोका आंदोलन, क्रांती चौक येथे तीन दिवस ठिय्या देत जागरण गोंधळ, अर्धनग्न आंदोलन करण्यात आले होते. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न, वसतिगृह, सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देणे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, याबाबतच्या प्रलंबित आहेत. पत्रकार परिषदेत राहुल पाटील, अशोक मोरे, किरण काळे, भरत कदम, पंढरीनाथ गोडसे यांची उपस्थिती होती. 
Edit- Pratap Awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं

SCROLL FOR NEXT