Aurangabad School News 
छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ, औरंगाबाद जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांमधील चित्र 

संदीप लांडगे

औरंगाबाद : शासन निर्देशानुसार जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु झाले. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यानंतरही दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. जिल्ह्यात २०१० शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या. त्यावेळी ५५ हजार ९३९ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता शाळांकडून घेतली जात असल्याने पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास संमतिपत्र दिले आहे.

त्यामुळे शाळा सुरू होण्यासह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी २५.३४, दुसऱ्या दिवशी ३३.९० तर तिसऱ्या दिवशी ३८.२० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. जिल्ह्यातील २ हजार १६८ शाळा आहेत. त्यापैकी २ हजार १५७ शाळा सुरु झाल्या आहेत. ११ शाळा अद्याप बंद आहेत. 

शाळांकडून दैनंदिन अहवाल 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. शिक्षक, पालकांत सकारात्मकता दिसून येत आहे. कोरोना नियमांचे नियमित पालन करावे, स्वच्छतेवर भर द्यावा, शाळा सॅनिटायझेशनमध्ये खंड पडू देऊ नये आदी सूचना देण्यात येत असून याबाबत दैनंदिन अहवाल मागवला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. 


शहरात पाचवीचे वर्ग कधी? 
राज्यात सर्वच ठिकाणी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, औरंगाबाद महापालिका हद्दीतील पाचवीचे वर्ग अद्याप बंद आहेत. ते कधी सुरु होणार याबाबत पालकांकडून शाळांना विचारणा केली जात आहे. 

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT