Aurangabad muncipal esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : विधानसभा मतदारसंघात २५ कोटींचे होणार रस्ते

पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांची कामे करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिका निधीतून १०० कोटी रुपयांची कामे करण्यास प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र महापालिका हद्दीतील विधानसभा मतदारसंघात समान निधी देण्याची अट डॉ. चौधरी यांनी टाकली आहे. त्यानुसार पूर्व, पश्‍चिम, मध्य मतदारसंघात प्रत्येकी २५ कोटी रुपयांची तर फुलंब्रीत कमी वॉर्ड असल्याने यापेक्षा कमी निधी मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिका फंडातून दोनशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांची कामे करण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश श्री. पांडेय यांनी दिले होते. पण डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार घेताच पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध होईपर्यंत रस्त्यांची कामे स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

आता रस्त्यांच्या कामांसाठी निधी प्राप्त होऊ शकतो असे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर रस्ते कामांना त्यांनी हिरवा कंदील दाखविला. पण शहराशी संबंधित असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये निधीचे समान वाटप करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यानुसार औरंगाबाद पूर्व, पश्चिम व मध्य मतदारसंघात प्रत्येकी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते. फुलंब्री मतदारसंघात वॉर्डांची सख्या कमी आहे. त्यामुळे या मतदारसंघाला कमी निधी मिळून शकेल, तो दहा ते पंधरा कोटींच्या घरात असेल असे सूत्रांनी सांगितले.

कामे झालेले रस्ते वगळले

रस्त्यांची यादी तयार करून वर्षे उलटला आहे. या काळात आमदार, खासदार निधीतून रस्त्यांची कामे झालेली आहेत. त्यामुळे अशी रस्ते वगळण्यात आली आहेत. दरम्यान निविदा प्रक्रियेपूर्वी पुन्हा एकदा रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT