st 1.jpg
st 1.jpg 
छत्रपती संभाजीनगर

ज्येष्ठांना एसटीत बसू द्यावे किंवा नाही ? कोण पडलंय संभ्रमात.

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यानंतर एसटी बस सुरू झाली. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या नियमावलीत ज्येष्ठ नागरीकांना आणि बालकांना तिकीट द्यावे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. काही वाहकांनी ज्येष्ठांना तिकीटे नाकारल्याच्या घटना घडल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 
एसटी सुरु झाल्यानंतर कुठल्याही कटकटीशिवाय प्रवास करणे शक्य झाल्याने प्रवासी वर्ग सुखावला आहे. गुरुवार पासून (ता. वीस) एसटी बससेवा सुरू झाली आहे. आता मात्र एसटीचा प्रवासी वाढत असल्याने आशादायी चित्र निर्माण झाल्यानंतर एसटीने ज्येष्ठ आणि बालकांना प्रवास करु द्यावा किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला. 

अमरावती विभागाचा संभ्रम 
अमरावती विभागात वाहक एस. डी. गजभिये यांनी २४ आँगस्ट रोजी दोन जेष्ठ नागरीकांना ७८ रुपायंची तिकीटे दिली. त्यानंतर कोवीड -१९ मुळे एसटीतून ज्येष्ठ नागरीकांना आणि १२ वर्षाखालील मुलांना प्रवास करता येत नाही, असे असतानाही जेष्ठांना तिकीटे दिल्याने या रकमेची परिपूर्ती खिशातून करावी असे आदेश आगार प्रमुखांनी काढले. हे आदेश सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे तीन दिवसाने २९ आँगस्ट रोजी अमरावती विभाग नियंत्रकांनी खुलासा केला. की, अमरावती आगार प्रमुखांना कुठल्याही सूचना नसताना त्यांनी ज्येष्ठांच्या तिकीटावर आक्षेप घेणारे पत्र काढले आहे. ज्येष्ठांना प्रवास नाकारण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयानेही पत्र दिलेले नसल्याने त्यांना प्रवास नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले. 

जूनच्या पत्राचा आधार 
जून महिन्यामध्ये कोरोनाची स्थिती वेगळी होती. त्यावेळी शासनाने ६० वर्षावरील नागरिक आणि दहा वर्षाखालील मुलांनी बाहेर पडू नये अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर ठोस निर्णय दिलेला नसला तरीही आज परिस्थिती बदललेली आहे. शासनाने हळूहळू अनलॉक करत सर्वच व्यवहार सुरु करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच आता ज्येष्ठ आणि मुलांवर बंधने लादता येणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

ज्येष्ठांना प्रवास नाकारता येणार नाही 
एसटी बस सुरु झाल्यानंतर प्रवाशाला कुठल्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. त्याचप्रमाणे ई-पासचे बंधनही एसटी साठी रद्द करण्यात आले. त्यामुळे केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा मुलांना प्रवास कसा रोखणार असा प्रश्न आहे. आई प्रवासाला निघाल्यास मुलगाही सोबत राहील हे ठरलेलेच आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही अटी ठेवल्या नसल्याने वृद्धांनाही प्रवासापासून वंचित ठेवता येणार नाही. 

एसटीने ज्येष्ठांच्या किंवा बालकांच्या प्रवासाबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना नाहीत. त्यामुळे त्यांना तिकीटे नाकारण्याचा प्रश्नच नाही. 
अरुण सिया (विभाग नियंत्रक, औरंगाबाद विभाग)

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT