Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरातील शाळा, शिकवण्या १५ मार्चपर्यंत बंदच

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे वर्ग वगळता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग, तसेच याच वर्गाचे क्लासेस १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) काढले. यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश होते.


कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारीला शहरातील क्लासेस सुरू झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. त्यानंतर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गेल्या आठवड्यात आदेश काढून पाचवी ते नववी व ११ च्या शाळा तसेच क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याने या वर्गाच्या शाळा व क्लास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी (ता. २७) प्रशासकांनी नव्याने आदेश काढत शाळा व शिकवण्या १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



...अन्यथा कारवाई
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन १५ मार्चनंतर पुढील निर्णय घेण्यात येई. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या संस्थांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ व ६० मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासकांनी दिला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Leopard : टाव्हरेवाडीत विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

SCROLL FOR NEXT