bamu kulguru.jpg 
छत्रपती संभाजीनगर

'बामु' विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे ! घ्या जाणून नेमकं काय घडल !

अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एक ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी मंगळवारी (ता. २९) संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने २४ सप्टेंबरपासून पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनाचाच हा परिणाम आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि अधिकाऱ्यांसोबत सोमवारी (ता. २८) बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे. परिणामी राज्यभरातील विद्यापीठांनी आपल्या परीक्षा दहा दिवस पुढे ढकलल्या आहेत. यात डॉ. येवले यांनी मात्र, किती कालावधीसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. उन्हाळी २०२० च्या परीक्षा एक ऑक्टोबरपासून निश्‍चित करण्यात आल्या होत्या. परंतु विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केल्यामुळे परीक्षा एक ऑक्टोबरपासून नियोजीत वेळेत सुरु करणे शक्य नसल्याचे कारण देण्यात आले आहे. नवीन वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रकाशीत करण्यात येणार आहे.

मंत्री सामंत यांच्यासोबत तासभर विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र तोडगा काही निघाला नाही. दोन महिन्यात मागण्या मान्य करु, असे मंत्री महोदय म्हणाले. तथापि शासन आदेश अथवा लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भुमिका कृती समितीने घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT