photo 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना : भारतीय जैन संघटनेचा आदर्श उपक्रम

अनिल जमधडे

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सुरु असतानाच रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद गोल्ड आणि पूर्णवाद परिवाराने उस्मानपुरा येथील लायन्स ब्लड बँकेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. दोन दिवस चालणाऱ्या या शिबीरात पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. २६) ५० जणांनी रक्तदान केले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

जगभरात थैमान माजविले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्येने शंभरी पार केलेली आहे. सध्या औरंगाबादसह देशभरात लॉकडाऊनची परिस्थती आहे. दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दोन दिवस रक्तदान 

त्यानंतर या तिन्ही संस्थांनी अगदी कमी वेळेत २६ आणि २७ मार्च असे दोन दिवस रक्तदान शिबीराचे आयोजन केले. विशेष म्हणजे एका तासाला सहा ते सात याप्रमाणे रक्तदात्यांना वेळ ठरवून देण्यात आली. त्यामुळे रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दीही झाली नाही. आयोजक, रक्तदाते आणि ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मिटर इतके अंतर ठेवून सॅनिटायझर आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. 

पन्नास जणांचे रक्तदान 

त्यामुळे पहिल्याच दिवशी ५० जणांनी रक्तदान केले. दुसऱ्या दिवशी उस्मानपुरा येथील लायन्स ब्लड बँकेत सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान रक्तदान शिबीर सुरु राहिल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आवाहन करण्यात आले.

यासाठी किशोर ललवाणी, पारस चोरडिया, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, राहुल दाशरथे, राहुल झांबड, अभिजित हिरप, सुदेश चुडीवाल, अक्षय साहुजी, सतनामसिंग गुलाटी, प्रविण काला, प्रसन्ना उगले, अश्विन झंवर, पवन पहाडे, मयुर राका, शितल जैन, पवन मुगदिया, धनंजय आकोलकर, आनंद मुठाळ, आदी परिश्रम घेत आहेत. या विपरीत परिस्थीतीत, सामजिक भान ठेवून आपण रक्तदान करावे आणि रक्तदान करण्यासाठी आपले नातेवाईक, मित्रांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT