चोरी.jpg
चोरी.jpg 
छत्रपती संभाजीनगर

व्यावसायिकाचे घर फोडून दोन लाख, २ तोळे सोने लंपास, औरंगाबादेतील घटना

सुषेन जाधव

औरंगाबाद : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना दीपनगरातील मुथियान रेसीडेन्सीमध्ये घडली. जवाहरनगर पोलिसांकडून रेसीडेन्सीमधील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम दिवसभर सुरू होते. 


लॉकडाऊनच्या काळात कपड्याचे दुकान बंद पडल्याने विशाल सुखलाल सोकिया (३३, रा. फ्लॅट क्र. २, मुथियान रेसीडेन्सी) यांनी घरात व्यवसाय सुरू केला आहे. २१ नोव्हेंबररोजी सोकिया हे कुटुंबियांसह कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील सासूरवाडीला गेले होते. त्यानंतर चोराने संधी साधून फ्लॅटचा लाकडी दरवाजा फोडला. त्यातून आत प्रवेश करत कपाटाच्या ड्रॉवरमधील दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबवले. सकाळी पावणेअकराच्या सुमारास सोकिया हे कुटुंबियांसह घरी परतले.

त्यावेळी त्यांना दरवाजा फोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेचच घरात धाव घेतली. तेव्हा कपाटातील दोन लाखांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर सोकिया यांनी घटनेची माहिती तात्काळ जवाहरनगर पोलिसांना दिली. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक भरत पाचोळे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी परिसरातील सीसी टिव्हींची तपासणी केली. याप्रकरणी सोकिया यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक भरत पाचोळे करत आहेत. सोकिया यांनी कपाटाला लॉक लावले नव्हते. त्यामुळे चोरांना जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. अशी माहितीही जवाहरनगर पोलिसांनी दिली. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT