photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

दुसऱ्याच्या करिअरवर कोण आहे खुश : वाचा 

अनिल जमधडे

औरंगाबाद : "फॉलो युवर ड्रीम' या चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणांच्या ग्रुपने समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेने शालेय विद्यार्थ्यांना शिकवण देण्याचा वसा घेतला आहे. विविध शाळांमध्ये जाऊन मोफत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर कसे निवडावे याचे शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 
"फॉलो युवर ड्रीम' हा शहरातील चार्टर्ड अकाउंटंट तरुणांचा ग्रुप आहे. या तरुणांनी शहरातील विविध शाळांमधील आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन या उपक्रमाची सुरवात केली आहे. 

विद्यार्थ्यांची निवड 

दहावीनंतर पुढे काय करावे याबद्दल मुलांना फारशी माहिती नसते. कोणते करिअर निवडावे याबद्दल संभ्रम असतो. विशेष म्हणजे अनेक पालकांनाही याबद्दल माहिती नसते. त्यामुळे पालक अर्धवट ऐकीव माहितीच्या आधारे मुलांची आवड न समजून करिअर ठरवून टाकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडण्याऐवजी बिघडण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळेच "फॉलो युवर ड्रीम'च्या टीमतर्फे विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्यात येत आहेत. 

करिअर ठरवताना 

श्रीरामनगर येथील सुशीला देवी हायस्कूलमध्ये मुलांसाठी "करिअर ठरवताना' हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये सीए विश्‍वास सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात स्वप्न पाहणे आणि त्याला पूर्ण करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. सौरभ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी डॉक्‍टर इंजिनिअर होण्याच्या अनाठायी हट्टाऐवजी विज्ञानात अनेक करिअरच्या संधी असल्याचे स्पष्ट केले. रमेश थेटे यांनी कॉमर्समधील विविध संधीची माहिती दिली. मारोती गिरी यांनी आर्टस शाखेच्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे कला शाखेतील विविध अधिकाऱ्यांची प्रोफाईल त्यांनी वाचून दाखवली. पंकज पाटील यांनी कृषी शाखेच्या व्होकेशनल कोर्सेससह खेळात करिअर कसे घडवावे याचे धडे दिले. सूचित शेटे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून हा उपक्रम यशस्वी केला. 

अशी आहे टीम 

शहरातील विविध शाळांची निवड करून धडे देणारी ही आहे टीम ः सूचित शेटे, रवी शिंदे, दीपक राऊत, मारोती गिरी, सौरभ कुलकर्णी राजेश मालू, रमेश थेटे, विश्‍वास सोमवंशी, पंकज पाटील, बद्रीनाथ खरात, कुणाल काबरा यांचा समावेश आहे. 

दीड हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण 

"फॉलो युवर ड्रीम' या ग्रुपने आतापर्यंत विविध सहा कार्यक्रमांच्या माध्यमाने दीड हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. किमान साडेतीन हजार विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचा निर्धार या ग्रुपने केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT