Accident News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News: पैठणमध्ये 4 गाड्यांचा भीषण अपघात; घटनेत पिता-पुत्र जागीच ठार तर आई गंभीर जखमी

एकाच कुंटुबातील शिक्षक पिता-पुत्र जागीच ठार तर आई गंभीर जखमी

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगर रोडवरील नक्षलवाडी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कारचा अशा चार वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.

सासरवाडीला जात असणाऱ्या कुटुंबाला रस्त्यात मृत्यूनं गाठलं आणि एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सासरवाडीला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि शिक्षक वडील आणि मुलाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर आई गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल तर चक्क दोन गाड्यांच्या मध्ये चेपल्यासारखीच झाली. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

या अपघातात पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर कौशल्या दहिफळे या गंभीर जखमी झाल्या आहे. दहिफळे हे दांपत्य सासरवाडीला जात असताना हा काळाने त्यांच्यावर घाला घातला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: देशी गायींच्या संवर्धनासाठी शासनाची 'लाडकी गाय योजना'; महिन्याला १,५०० रुपये, संकरित गायींना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

Beed News: एकाच झाडाला १८ वेगवेगळ्या जातीचे आंबे; नारळापेक्षा मोठा आंबा; पाण्याचं दुर्भिक्ष्य तरी १६ एकरात फुलवली बाग

Vidarbha News: विदर्भात उष्णतेची भीषण लाट; अमरावतीत पारा ४६.८ अंशांवर; अंगाची लाहीलाही

Latest Marathi News Live Update : डिझेल मिळेना, शेती संकटात; जालन्यात पेट्रोल पंपांवर गर्दी

Farmer Success Story: बांधावर लावलेल्या मलबेरीने बदलले नशीब; एक रुपयाही खर्च नाही, उत्पन्न मात्र लाखमोलाचे, मधुकर गावडे सहा वर्षांपासून घेतात उत्पन्न..

SCROLL FOR NEXT