Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्यातील ‘कोरोना’चा आढावा 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग पसण्याचा धोका लक्ष्यात घेऊन या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाने घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१६) व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे राज्यस्तरीय आढावा घेतला. 

विभागीय आयुक्तांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून कोरोनाबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत खबरदारी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खासगी टूर कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा.

जनता शासनास सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु जनतेत भिती निर्माण होणार नाही, याची देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी टाळावी. बस, रेल्वे आदी सार्वजनिक ठिकाणांवर खबरदारीच्या उपाययोजनांची प्रसिद्धी करण्यात यावी. माध्यमे, लोक प्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना केल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना यावेळी योग्य त्या सूचनाही केल्या. 

औरंगाबादेतील कोरोना बाधित रुग्णावर सुरू असलेले उपचार आणि विभागात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांबाबत श्री. केंद्रेकर यांनी श्री. ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली. कोरोनाबद्दल काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, शासकीय व वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT