photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही जेवण देऊ शकता का? 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटात मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत जिल्ह्यामध्ये चाइल्ड हेल्पलाइन (क्र. १०९८) मार्फत १९० मुलांना मदतीचा हात देण्यात आला. शहरी व ग्रामीण भागामध्ये चाइल्ड हेल्पलाइनची टीम लॉकडाउनमध्ये चिमुकल्यांना मदतीचा हात देत आहे. अक्षरशः १०९८ वर कॉल येतो, ‘ताई, दादा आज आमची मुले उपाशी आहेत, आम्हाला घरही नाही आणि जवळ काही खायलाही नाही, तुम्ही काही पोराला खायला आणून देता का?’ हा संवाद ऐकून मन हेलावून जाईल अशी परिस्थिती आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अन्नधान्याची मदत 

जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार व त्यांची मुले बाहेर जिल्हा व राज्यातून मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. या काळात जास्तीत-जास्त रेशनची मदत पालकांकडून मागितली जात आहे. चाइल्ड हेल्पलाइनने अशा काही कुटुंबांना व चिमुकल्यांना मदतीचा हात देऊन अन्नधान्याची मदत केली आहे. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्क व हात धुण्यासाठी साबण देण्यात आला आहे. जास्तीत-जास्त मदत हवी असणारी कुटुंबे वाळूज, रांजणगाव, बजाजनगर, रेल्वेस्टेशन वस्ती, विटावा गाव, करोडीगाव या भागातील मुले व कुटुंब आहेत. लॉकडाउन व संचारबंदीमुळे शाळा बंद असल्याने त्यामुळे मुलांची मानसिकता वेगळी होत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कृतियुक्त उपक्रमही घेतले

चाइल्ड हेल्पलाइन टीमने बालगृहातील बालकांना वेगवेगळ्या कृतियुक्त उपक्रमाध्ये कसे आनंदी ठेवता येईल असा एक प्रयत्न केला. त्यामध्ये लायन्स बाल सदन, बाबा साई बालगृह व भगवानबाबा बालिकाश्रम यामधील मुले व मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे सदरील बालकांना त्यांच्या बालगृह अधीक्षक यांच्याकडे फोनवर इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती देऊन चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन टीममध्ये प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र समन्वयक अन्नपूर्णा ढोरे, समुपदेशक मिलिंद अकोलकर, राजेश सरकटे, योगेश उगले, आकाश बेडवाल, उज्ज्वला भालेराव, आम्रपाली बोर्डे यांनी पुढाकार घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT