income tax raid on builders in aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत दोन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे

प्रकाश बनकर

औरंगाबाद : करचुकवेगिरी केल्याप्रकरणी शहरातील सूतगिरणी चौकातील दिशा ग्रुपसह अन्य एका बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी (ता. 21) छापा मारला. दोन्ही बांधकाम व्यावसायिकांच्या शहरातील सात ठिकाणांची झाडाझडतीही घेतली. नाशिक, पुणे येथील 70 प्राप्तिकर अधिकारी यात सहभागी असून, त्यांच्या हाती महत्त्वपूर्ण दस्तऐवज लागले आहेत. अजून चार दिवस ही कार्यवाही चालणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली. 

करचुकवेगिरी प्रकरातून या बांधकाम व्यावसायिकांच्या औरंगाबाद, पुणे, नगर, बंगलोर यासह देशभरातील 43 ठिकाणांच्या कार्यालयात एकाच वेळी हे सर्च ऑपरेशन करण्यात आले. यात या व्यावसायिकांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. एवढे नव्हे तर दोन्ही बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पात भागीदारी असलेल्यांच्याही प्राप्तिकर कार्यालयातर्फे चौकशी करण्यात येत आहे. यासाठी विशेष करून नगरहून पोलिसांचा बंदोबस्त आणण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात तसेच राहत्या घरी दस्तऐवज तपासण्यात येत आहेत. याच कारवाईत दोन्ही बांधकाम व्यावसायिकांकडे विविध प्रकल्पाच्या कार्यालयात काम करणाऱ्यांचा जबाब आणि चौकशी केली जात आहे. सहा ते सात महिन्यांनंतर प्राप्तिकर विभागाची मोठी कार्यवाही शहरात केली जात आहे. 

रात्री उशिरापर्यंत कार्यवाही 
सकाळी 8.45 वाजेपासून ही कार्यवाही सुरू झाली. दोन्ही बिल्डरच्या कार्यालय आणि घरी व इतर ठिकाणी पोलिस बंदोबस्तात कार्यवाही सुरवात झाली. यासह दिशाच्या पुणे, नगर, बंगलोर येथेही कसून तपासणी करण्यात येत आहे. शहरातील ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालली. 

हेही वाचा -'तान्हाजी'तील 'चुलत्या' नेमका आहे तरी कोण, वाचा संघर्ष...

भागीदारावर प्राप्तिकर तपासणी 
दोन्ही बांधकाम व्यावसायिकांशी भागीदारी करणाऱ्यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली. भागीदारांचीही सकाळपासून सुरू झालेली दस्तऐवजाची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कार्यवाहीत किती करचुकवेगिरी समोर आली, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT