विद्यार्थी.png
विद्यार्थी.png 
छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांच्या 'गणवेशाला कोरोना' ; यंदा मिळणार एकच गणवेश! 

संदीप लांडगे

औरंगाबाद : समग्र शिक्षा अंतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश वितरीत केले जातात. यंदा मात्र कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांच्या गणवेशाला सुद्धा बसला आहे. शासनाने यंदा गणवेश खर्चात तब्बल ५० टक्क्यांनी कपात केली असल्यामुळे एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात येणार आहे. 


शासनाने राज्यात अनेक जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची सुद्धा शक्‍यता आहे. त्यानुसार शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन शैक्षणिक सत्र २०२०-२१ करिता मोफत गणवेश योजनेच्या अंदाजपत्रकाससुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. वर्ग पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त व भटक्‍या जाती मुली, ओबीसी संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. मागील वर्षी प्रती विद्यार्थी दोन गणवेशाप्रमाणे सहाशे रुपये शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वळते करण्यात आले होते. मात्र, यंदा एकच गणवेश दिला जाणार आहे.

त्यासाठी तीनशे रुपये अनुदान राहील. प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळांसाठी ८ कोटी ७७ लाख ९० हजार दोनशे रुपयांचे अनुदानाची तरतूद आहे. मात्र, गणवेश निधीला कात्री लावण्यात आल्याने ५० टक्केच निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एक लाख चार हजार ८६० मुली, एससी विद्यार्थी - १५ हजार ४०२, एसटी विद्यार्थी -१० हजार ५७७, बीपीएल पालकांची मुले-१५ हजार ४७८ असे एकूण एक लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थी गणवेशाचे लाभार्थी आहेत.

यंदा गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळला आहे. मंजूर निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार दिला जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या स्तरावरून गणवेश पुरवठा करण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. समग्र शिक्षाअंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकात भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने १८ जून २०२० ला गणवेशासाठीच्या तरतुदीला मान्यता दिलेली आहे. 

फिजिकल डिस्टन्सिंगचा अडथळा 
विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी कपड्याचे माप घ्यावे लागते. पंरतू, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे माप घेण्यासाठी पालकांकडून संमती मिळत नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT