Corona News Aurangabad
Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Corona : औरंगाबादेत आणखी दोघांचा मृत्यू; बळींची संख्या ४८ वर 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबर दगावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शुक्रवारी (ता.२२) दिवसभरात तीन जणांचा बळी गेला तर शनिवारी (ता.२३) किराडपुरा व सिटी चौक येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४८ वर गेली आहे, असे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

शहरात शनिवारी सकाळी कोरोनाधित २३ रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णांचा आकडा १२४१ वर पोचला आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला. त्यात किराडपुरा येथील ७५ वर्षीय व सिटीचौक परिसरातील ७२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. किराडपुरा येथील रुग्णास १७ मेला  घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णांचा अहवाल १८ मेला पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना त्यांचा बायलेंट्रल न्यूमोनिया विथ एक्युट रेस्पीरेटरी डिसट्रेस सिंड्रोम ड्यु टू कोविड-१९ इन नोन केस ऑफ हायपोथॉयरीडीसम या कारणाने शुक्रवारी (ता.२२) रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सिटी चौक येथील ७२ वर्षीय रुग्णास १९ मेला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली होते. २० मेला या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाचा बायलेंट्रल न्यूमोनिया विथ एक्युट रेस्पीरेटरी डिसट्रेस सिंड्रोम विथ सायटोकाईन स्ट्रॉम ड्यु टू कोविड-१९ मुळे शनिवारी (ता.२३) पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. कोरोनामुळे घाटी रुग्णालयात आत्तापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला तर इतर रुग्णालयात पाच जण अशा एकूण ४८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

घटित ७४ रुग्णांवर उपचार सुरू
घाटीच्या कोविड रुग्णालयात सध्या एकूण ७४ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे. यांपैकी ६५ रुग्णांची स्थिती सामान्य असून नऊ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

बाहेरगावाहून आले अन् पॉझिटिव्ह निघाले  
शहरातील नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, शुक्रवारी (ता.२२) आणखी पाच वसाहतींमध्ये रुग्ण आढळून आले. त्यातील ठाकरेनगर एन-दोन व शिवाजीनगर येथील रुग्ण बाहेरगावाहून शहरात आल्याचे समोर आले आहे. तसेच कुवारफल्ली, सुराणानगर, जवाहर कॉलनी येथे संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT