संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार... 

संदीप लांडगे

औरंगाबाद : ‘हाय... फ्रेंड्स इट्स माय फोटोग्राफी’, ‘मेड बाय मी...’ ‘माय आर्ट्स्’ अशी कॅप्शन देत आपली एखादी कलाकृती फेसबूक, इन्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरवर अपलोड होते. त्याला लॉइक्स, कॉमेंट्सचा पाऊस पडत असताना ‘तुला येत का?’ किंवा ‘दुसऱ्याचं कॉपी पेस्ट केलं असेल’ अशा काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तर मनोधैर्य खचून नैराश्‍य येण्याचे प्रकार तरुणाईत वाढले आहेत. अशा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

डॉ. शिसोदे म्हणाले, ‘‘लॉकडाउनमुळे लोक घरात आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या घडामोडी, त्याचे सेल्फी, एन्जॉयमेंट्स स्टेट्स तरुणाई सोशल मीडियावर टाकत आहे. पण, त्यावर वाईट कॉमेंट्स आल्या की नैराश्‍य येते. अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते सोशल मीडियावर नेहमी व्यक्त होणे, हा एक मानसिक विकार असू शकतो.

सध्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने नैराश्‍य आले आहे. स्पर्धात्मक करिअर, घड्याळाच्या काट्यावर चालण्याची सवय असलेल्या तरुणाईची वेळ लॉकडाउनमुळे थांबली आहे. त्यामुळे कौटुंबिक, वैयक्तिक समस्येमुळे तरुणाईचा ताण वाढत आहे. त्यात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कालांतरणाचे त्याचे व्यसन रूपांतर होते’’, असेही डॉ. शिसोदे यांनी सांगितले. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

चिडचिडपणात वाढ 
सतत मोबाईलच्या स्क्रिनवर असणारे डोळे, चालणारी बोटे, एखादा ऑनलाइन गेम खेळतानची व्हर्च्युल स्पर्धा त्यामुळे चिडचिडेपणा वाढला आहे. अनेक तरुण नैराश्‍येत जावून एकलकोंडे बनले आहेत. सतत निराश वाटणे, उदासी जाणवणे, आत्मविश्वास नाहीसा होणे, नव्या गोष्टी करण्यात रस नसणे अशी लक्षणे ही मानसिक आजाराची असू शकतात, याचे त्यांना ज्ञान नाही. त्यामुळे युवा पिढीत मनोविकाराबाबत जागृती होणे गरजेचे असल्याचा सल्ला मानोसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

लॉकडाऊनमुळे काहीच काम नसल्यामुळे स्मार्टफोनचा अती वापर वाढला आहे. ऑनलाइन गेमचा वाढता ट्रेंड यामुळे तरुणाई नैराश्यात गेली आहे. सहज उपलब्ध होणारा डेटा आणि तो संपविण्यासाठी वेगवेगळे फंडे यामुळे त्यात अधिकच भर पडली. आपण मानसिक आजारग्रस्त आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आई-वडील, नातेवाइकांनी त्यांच्यातील बदल ओळखून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ 

  • सेल्फायटिस (सेल्फी काढण्याचे व्यसन) 
  • ऑनलाईन गेम अॅडिक्शन 
  • फेसबुक डिप्रेशन 
  • नैराश्य मन एकाग्र न होणे 
  • सायकोसिस डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) 

---
ही आहेत कारणे 

  • इंटरनेट व सोशल मीडियाचा अतिवापर 
  • सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया 
  • व्हॉट्सॲप, फेसबुकमुळे येणारा तणाव 
  • ऑनलाइन गेमच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम 
  • ऑनलाइन गेम खेळताना येणारा तणाव 
  •  सोशल मीडियावर सर्फिंग करताना इतरांकडून मिळणारी वाईट वागणूक 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

SCROLL FOR NEXT