Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

गवंडी कामाला जाताना कामगाराच्या दुचाकीला क्रेनची धडक, एक ठार अन् दोघे गंभीर

पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादामुळे मृत कामगाराचे दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन करण्यात आले.

शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद ) : औरंगाबाद येथे दुचाकीने गवंडी कामासाठी जात असतांना बीड बाह्यवळण रस्त्यावरील सहारा सिटीसमोर क्रेन व दुचाकीच्या अपघातात (Accident) एक जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.१७) रोजी सकाळी घडली. मात्र चिकलठाणा, एमआयडीसी व मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादामुळे सदरील मृत कामगाराचे आज सोमवारी (ता.१८) शवविच्छेदन करण्यात आले. वैजीनाथ तातेराव नागरे असे मृत गवंडी कामगाराचे नाव आहे. वैजीनाथ तातेराव नागरे (वय ३०), शिवाजी तातेराव नागरे (वय ३७ ) हे दोन सख्ख्ये भाऊ व नामदेव सुदाम गायकवाड (वय ४३, तिघे रा. काद्राबाद, ता.औरंगाबाद ) हे रविवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने औरंगाबाद (Aurangabad) येथे गवंडी काम करण्यासाठी जात होते. (Crain Hit Two Wheeler, One Died, Two Serious In Aurangabad)

दुचाकी बाह्यवळण रस्त्यावरील सहारा सिटीजवळ येत क्रेनची त्यांच्या दुचाकीला धडक लागली. यात वैजीनाथ नागरे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे मोठे बंधू शिवाजी नागरे व नामदेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अपघात होऊन २४ तास झाले. मात्र पोलीस ठाणे हद्दीच्या वादामुळे सदरील मृत वैजीनाथ नागरे यांचे आज सोमवारी शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

मृत वैजीनाथ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या अपघाताची नोंद एमआयडीसी चिकलठाणा पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास एमआयडीसी चिकलठाणा पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT