Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

मोबाईलवर एसएमएस वाजताच शेतकऱ्यांना आनंद

बाळासाहेब शिंदे, जरंडी

सोयगाव (औरंगाबाद) : खरीपाची अंतिम आणेवारी सरासरी 43 टक्क्यांवर आलेल्या सोयगाव तालुक्याला शुक्रवारी सोयाबीन आणि मका पिकांच्या पिकविम्यापोटी नुकसानीची रक्कम मंजूर झाली आहे. शुक्रवारी अचानक मोबाईल संदेश वाजल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे संदेश आले की काय, असा भास झाला.

शेतकऱ्यांनी अखेरीस बँकांमध्ये चौकशी केल्यावर मका आणि सोयाबीन पिकांचा पीकविमा खात्यावर जमा झाल्याचे संबंधित बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला.

सोयगाव तालुक्यात शुक्रवारचा दिवस केवळ शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेशाने गाजला होता, परंतु शुक्रवारी जिल्ह्याची कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होणार असल्याने शेतकरीही अपडेट झाले होते. परंतु आलेल्या संदेश हे सोयाबीन आणि मका पिकांच्या विम्याच्या रक्कमेचे असल्याचे कळल्यावर मात्र शेतकऱ्यांना थोडाफार का होईना आनंद झाला.

सोयगाव तालुक्याची अंतिम सरासरी 43 टक्के घोषित झाली होती. त्यामुळे अवकाळीच्या आधी पावसाचा पडलेला खंड आणि त्यानंतर मात्र ऐन कापणीवर आलेल्या पिकांवर झालेला अवकाळी पावूस यामुळे खरीपाचा हंगाम हातातून निसटला होता. त्यासाठी प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीचा मावेजा तुटपुंज्या स्वरुपात दिल्यावर मात्र शेतकऱ्यांचे डोळे कंपन्यांच्या पीकविमा आणि शासनाच्या कर्जमाफी योजनेकडे लागले होते.

शुक्रवारी कर्जमाफीची अपेक्षा असतांना त्याऐवजी पीकविम्याचा धनलाभ शेतकऱ्यांना झाला. सोयाबीन पिकांसाठी हेक्टरी 29 हजार 550 रुपये याप्रमाणे आणि मका पिकाला 22 हजार 633 रुपये हेक्टरी लाभ झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या मोबाईलला कव्हरेज नसल्याने शेतकऱ्यांनी कव्हरेजमध्ये जाऊन पिकविम्याचे संदेश मोबाईलवर मिळवून घेतले.

आकडेवारी मात्र हाती आली नाही

मका आणि सोयाबीन पिकांच्या पिकविम्या बाबतची आकडेवारी अद्याप तालुका कृषी विभागालाही प्राप्त न होता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने तालुक्याचा कृषी आणि महसूल विभागही अनभिज्ञ राहिल्याने गोंधळ उडाला होता. मात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता खात्यावर आलेली रक्कम बँकेतून काढून घेतली आहे.

पिकविम्यातही दोन हेक्टरची मर्यादा

एन.डी.आर.एफ.च्या निकषाप्रमाणे कंपन्यांनीही पीकविमा मंजुरीबाबत दोन हेक्टरची मर्यादा घालून दिलेली असल्याने शेतकऱ्यांना दोन्ही पिकांचा दोन हेक्टरच्या मर्यादेत पीकविमा मंजूर झालेला आहे, मात्र तालुक्याची रक्कम आणि शेतकरी संख्या हाती आली नव्हती.

कापूस पिकविम्याची प्रतीक्षा

पिकविम्या बाबत कंपन्यांनी टप्प्याटप्प्यात पिकांचे विमे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम हाती घेतले असल्याने मका, सोयाबीननंतर आता कापूस पिकाचाही विमा खात्यावर वर्ग होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आता कापूस पिकाच्या विम्याची प्रतीक्षा राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT