Omprakash Rajenimbalkar and Ranajagjitsinha Patil esakal
छत्रपती संभाजीनगर

Dharashiv : 'तू तुझ्या औकातीत राहा भंगारचोर'; ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला चांगलंच सुनावलं

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हळू आवाजात बोलण्याचा सल्ला ओमराजेंना दिला.

सकाळ डिजिटल टीम

तेरणा प्रकल्पाच्या (Terna Project) बंद पाइपलाइनचा विषय निघाला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये हुमरातुमरी झाली.

धाराशिव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajitsingh Patil) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. तेरणा प्रकल्पाच्या बंद पाइपलाइनच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी (ता. पाच) बैठक सुरू झाली. घारगाव (ता. कळंब) येथील जलजीवन मिशनच्या कामाचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. यावर एका अधिकाऱ्याने तांत्रिक मुद्द्याचे कारण पुढे केले. त्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यास जाब विचारला. त्यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हळू आवाजात बोलण्याचा सल्ला ओमराजेंना दिला.

यावरूनही दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर तेरणा प्रकल्पाच्या (Terna Project) बंद पाइपलाइनचा विषय निघाला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये हुमरातुमरी झाली. 'औकातीत राहा, बाळ आहेस तू, ट्रस्टचा लुटारू, भंगारचोर' अशा शब्दांत एकमेकांचा उद्धार करण्यात आला. दोघेही एकमेकांना एकेरीवर येऊन बोलत होते.

यावेळी सभागृहही अवाक् झाले. अनेक दिवसांपासून दोघांत वाद गेल्या अनेक दिवसांपासूनचा दोघांमधील हा वाद आहे. यापूर्वीही एका नियोजन समितीच्या बैठकीत असा प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याची व दोघांमधील राजकीय वैमनस्याची चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT