Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

कार्यालयात न येताच पाठविले पदभाराचे पत्र, औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओचा वाद चिघळण्याची शक्यता

माधव इतबारे

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सीईओ पदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची एक फेब्रुवारीला नियुक्ती केली. गुरुवारी (ता. १८) आपण रूजू झाल्याचे पत्र त्यांनी दिले पण कार्यालयात आलेच नाहीत. विशेष म्हणजे या बदलीला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याचे सांगितले जात आहे.


औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सीईओपदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. आत्तापर्यंत सीईओपद हे महापालिकेच्या आयुक्तांकडेच होते पण राज्य शासनाने एक फेब्रुवारीला आदेश काढत सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. नगर विकास विभागाने परस्पर केलेल्या नियुक्तीचा वाद पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर मांडण्यात आला.

शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे सीईओपदी पांडेय यांनाच कायम ठेवावे अशी मागणी केली. पांडेय यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक प्रकल्प सुरू आहेत. या कामावर सीईओ बदलल्याने परिणाम होऊ शकतो, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असतानाच गुरुवारी बाबासाहेब मनोहरे यांनी पत्र लिहून आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदाचा पदभार घेत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. मात्र ते गुरूवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात आलेच नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कार्यालयात न येता परस्पर पदभार कसा घेतला? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलचं T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान न मिळण्यावर मोठं विधान; म्हणाला, निवड समितीने...

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण; छाननी समिती कशासाठी?

Nashik News : तुमच्या खिशातील चिल्लर तुम्हाला बनवू शकते लखपती? नाशिकमध्ये नाणी-नोटांच्या खरेदी-विक्रीची धूम

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT