Employment of 35 women through Community Police and Dhawal Revolution 
छत्रपती संभाजीनगर

कम्युनिटी पोलीस व धवल क्रांतीच्या माध्यमातून ३५ महिलांना रोजगार

प्रकाश बनकर

औरंगाबाद :कोरोनामुळे सर्वकाही ठप्प आहे. यात मोलमजुरी करणाऱ्यांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशाच बिकट परिस्थितीत हतबल झालेल्या शहरातील ३५ महिलांना कम्युनिटी पोलिस व धवल क्रांती रिसर्च  डेव्हलपमेंट फाउंडेशन माध्यमातून रोजगार मिळाला आहे. या महिला सध्या शहरातील विविध भागांत १० हजार मास्क बनवत आहेत. संरक्षणाबरोबर सामाजिक दायित्वही औरंगाबाद पोलिस या कार्यातून पार पाडत आहे. 

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश ठप्प आहे. कंपनी बंद पडल्या आहेत, सर्व व्यवसाय बंद आहे. त्यावर अवलंबून असलेल्याचे हाल होत आहेत. अशातच शहरातील कर्तव्यदक्ष पोलिसांतर्फे महिलांना रोजगार देण्यासाठी पुढे आले आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कम्युनिटी व धवल क्रांती रिसर्चॲण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे सातारा परिसर, सिटी चौक पोलिस ठाण्याचा परिसर, चंपा चौक येथील ३५ महिलांना मास्क बनविण्याचे काम दिले आहे. यातील काही महिलांकडे शिलाई मशीन नव्हत्या. ही अडचणही पोलिस व धवल क्रांतीतर्फे दूर करीत तिन्ही भागांतील महिलांना २२ शिलाई मशीन देण्यात आल्या, त्याच मशीनच्या माध्यमातून मास्क बनविण्यात येत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जानेवारीत प्रशिक्षण 
कम्युनिटी पोलिस व धवल क्रांतीतर्फे शहरातील महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येताहेत. याच अंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या शहरातील मोठमोठ्या मॉल्ससाठी लागणारे कापडाचे शिवणकाम 
या महिलांना देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी महिलांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये शिलाई मशीनचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. लॉकडॉऊनपूर्वी काही मॉलच्या ऑर्डरही आल्या होत्या. कोरोना काम सुरूच होऊ शकले नाही. याच महिलांना कोरोनापासून बचावासाठी मास्कची ऑर्डर पोलिसांनी मिळवून दिली आहे. आतापर्यंत तीनही ठिकाणाहून या महिलांनी सात हजारपेक्षा जास्त मास्क तयार केले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या माध्यमातून महिलांना अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिदिन रोज मिळतो आहे. अशी माहिती धवलक्रांतीचे डॉ. किशोर उडाण व कम्युनिटी पोलिसचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली

सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिस कम्युनिटीवर धवल क्रांतीच्या माध्यमातून पंचशीलनगर व स्वराज्यनगरातील महिलांना रोजगारही मिळाला आहे. सध्या मास्क बनविण्याची ऑर्डर आम्हाला मिळाली आहे. या कठीण परिस्थितीत पोलिसांनी दिलेला आधार कुटुंबीयांसाठी मनोबल वाढवणारा आहे. 
- प्राजक्ता भवर, मास्क तयार करणारी महिला 

पोलिस कम्युनिटी व धवल क्रांतीच्या माध्यमातून शहरातील महिलांना रोजगार देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संरक्षणची जबाबदारीबरोबर सामाजिक जबाबदारी पार पाडत आहोत. 
या महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देत त्यांच्याकडून मास्क तयार करत आहोत. यासाठी सोशल डिस्टन्स ठेवले आहे. योग्य ती खबरदारी घेत व सर्व नियम पाळून हे काम करत आहोत. तयार करण्यात येणारे हे १० हजार मास्क झोपडपट्टी परिसरात वाटप करण्यात येणार आहेत. 
- घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक 
 
सध्याचा काळ कठीण आहे. या काळात पोलिसांना सहकार्य करत महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचा अभ्यास करत शहरातील विविध भागांतील महिलांना २२ शिलाई मशीन देत रोजगार दिला आहे. या माध्यमातून महिला सक्षम करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. कितीही मोठे संकट येऊ द्या आम्ही खंबीर असल्याचा संदेश यातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- डॉ.किशोर उढाण, धवल क्रांती 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: ठाकरे बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट : अमृता फडणवीस

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT