Exercise News 
छत्रपती संभाजीनगर

Video: हा काढा घ्या अन् रहा फिट ॲण्ड फाईन, लाॅकडाऊनमध्ये हे गरजेचंच

सुषेन जाधव

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात आपण घरात बसलेलो आहोत. दरम्यान कोरोना व्हायरसचा पार्दूभाव होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी सर्वचजण विविध उपाय करत योग्य ती काळजी घेत आहेत. मात्र आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने दिवसाची सुरवात सकाळचं कोवळं ऊन घेऊन करावी.

जवळपास बहूतांश जणांना हे शक्य असते. कारण कोवळ्या उन्हात जास्त प्रमाणात व्हिटॅमीन ‘डी’ असते. जे की रोगप्रतिकारण शक्ती वाढविण्यास मदत करत असते असा सल्ला होमिओपॅथिक कन्सल्टंट तथा आहारतज्ज्ञ डॉ. मोहिनी काथार- चौधरी यांनी दिला आहे. डॉ. मोहिनी यांनी सांगितले की, कोवळ्या उन्हाबरोबरच सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, अंजीर, मणूका हे सगळं भिजवून घ्या. याशिवाय चहा, कॉफीएवजी अद्रक, काळी मिरी, दालचिनी, तुळस, हळद हे सर्व उकळून घेऊन त्यात मध टाकल्यानंतर उत्तम काढा बनतो. असा काढा घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तृणरस यामध्ये ॲण्टीऑक्साईड खूप जास्त प्रमाणात असते हेही घेऊ शकतात.

लहान मुलांना रोज सकाळी लिंबूपाण्यात मध टाकून प्यायला दिलंत तेही त्यांच्यासाठी उत्तम असते. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी या लिंबूवर्गीयफळांत व्हिटॅमिन सी जास्त असते. हे जास्तीत जास्त आहारात समावेश करा. जेवणात सर्व हिरव्या भाज्या, कडधान्य, तृणधान्य, कोशिंबीर, जवस, कारळे, लसूण, कडीपत्ता आदि खा. हळदीचं दूधात जायफळ, सुंठ, गुळ टाकून पिल्याने याची गुणवत्ता आणखीन वाढते.

याशिवाय फळे रोज खाऊ न शकणाऱ्यांनी व्यक्ती दोन वेळा व्हिटॅमीन सी च्या गोळ्याही घेऊ शकतात, मात्र अशा व्यक्तींना कोणता आजार नको. भाज्या धुण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगारचा वापर करा. केवळ आहारच नाही तर झोप आणि व्यायामही तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढविते. त्यामुळे रोज कमीतकमी आठ तास झोप आणि तीस ते चाळीस मिनीटे व्यायाम करा असा सल्लाही डॉ. मोहिनी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT