stp plant.jpg 
छत्रपती संभाजीनगर

‘एसटीपी’च्या पाण्यावर होणार शेती 

माधव इतबारे

औरंगाबाद ः कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहर परिसरात मल-जलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) सुरू केले. मात्र त्यातून निघणारे शेकडो एमएलडी पाणी रोज वाया जात आहे. या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक असून, महापालिका प्रशासनाचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश आले आहे. झाल्टा ग्रामपंचायत हे पाणी घेणार असून, तसा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे पाणी शेतीसाठी वापरले जाणार आहे. त्यानुसार महापालिका रोज दोन एमएलडी पाणी देणार असल्याचे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
महापालिकेने सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचे काम केले आहे. त्यात कांचनवाडी, पडेगाव, झाल्टा येथे एसटीपी प्लांट उभारले आहेत. या प्रकल्पांची क्षमता सुमारे १५० ते १६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची आहे. मात्र सध्या ६० ते ७० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. या पाण्याचा पुनर्वापर होणे गरजेचे आहे. शासनाने औद्योगिक क्षेत्रात या पाण्याचा वापर व्हावा, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार महापालिकेने एमआयडीसी, डीएमआयसीसोबत संपर्क साधला. या पाण्यावर आणखी प्रक्रिया होण्याची गरज असल्याचे कारण देत पाणी कोणी घेतले नाही. सांडपाण्याचा वापर व्हावा, यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता.

दरम्यान, झाल्टा ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून, महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. झाल्टा गावाची निवड राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना महापालिकेने प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. दोन एमएलडी पाणी रोज मिळावे, अशी मागणी आहे. स्वखर्चातून हे पाणी आपल्या शेतात नेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. यासंदर्भात श्री. पांडेय म्हणाले, एसटीपी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर आणखी वाढला पाहिजे, यासाठी अभ्यास सुरू आहे. लवकरच इतर पर्यायदेखील उपलब्ध होतील. 


उद्योग, बिल्डरांना सक्ती 
महापालिकेने दिलेले पाणी गावपातळीवर वॉटर मॅनेजमेंट कमिटी वाटप करील. उद्योजकांनी, बिल्डर्सनी देखील एसटीपीचे पाणी वापरावे, अशी सक्ती महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.

(Edit - Pratap Awachar) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT