Crime 
छत्रपती संभाजीनगर

जूना वाद उफाळला, अन त्याला एकट्याला गाठले, मदतीला कोणीच नव्हते, शेवटी...

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: पूर्ववैमनस्यातून तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणात चौघांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी (ता.३०) रात्री अटक केली. शुभम किरण शर्मा (२५), सुमित किरण शर्मा (२०, दोघे रा. कैलासनगर, स्मशान मारोतीरोड), अजय भाऊसाहेब गात (२०, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) व सुरत विलास गायकवाड (१९, रा. गोधडीपुरा, औरंगाबाद) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात गंभीर जमखी योगेश मुळे याचा मोठा भाऊ उमेश मुळे (३८, रा. कैलासनगर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, योगेश हा पत्नी व मुलासह संजयनगरात राहतो व तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. सात-आठ महिन्यांपूर्वी योगेशचा आरोपी शुभम शर्मा याच्याशी किरकोळ वाद झाला होता. २९ जूनरोजी दुपारी उमेश घरी असताना योगेशचा मित्र सागर जाधव हा घरी आला व त्याने तथागत चौकात योगेशला शुभम व काही मुले मारहाण करीत असल्याचे सांगितले.

त्यामुळे उमेश धावत तथागत चौकात गेला असता, तेथे आरोपी सूरज गायकवाड, सुमित शर्मा, सागर यांनी योगेशला धरून ठेवले होते व शुभम हा लोखंडी फावड्याने तर अजय गात हा चाकूने योगेशला मारहाण करीत होते. लोक जमा झाल्याने आरोपींनी तेथून धूम ठोकली. दरम्यान, गंभीर जखमी योगेशचा उपचारासाठी घाटीत दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना बुधवारी (ता.एक) न्यायालयात हजर करण्यात आले असता, चौघा आरोपींना चार जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी बुधवारी (ता.एक जुलै) दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT