3crime_201_163 
छत्रपती संभाजीनगर

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, औरंगाबादेत गजबजलेल्या भागातील धक्कादायक घटना

मनोज साखरे

औरंगाबाद : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला रामगिरी हॉटेलजवळील स्टॉपवर बोलाविले. ती तेथे आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्याने तिला कारमध्ये बसण्याचे सांगून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला एका जागी नेले व कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचाराचा हा प्रकार १४ नोव्हेंबरच्या रात्रीचा; परंतु अत्याचार करणाऱ्या संशयिताने तिला धमकावले होते. त्यामुळे धीर बळावल्यानंतर तिने शनिवारी (ता.२६) पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर कासार, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. बायजीपुऱ्यातील २९ वर्षीय पीडितेचे बीए-डीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ती घरीच शिकवणी घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. शिकवणीसाठी ती नवीन जागेच्या शोधात होती. बीड बायपास परिसरात दोन महिन्यांपूर्वी भाड्याने खोली शोधत असताना मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी तिची ओळख झाली. त्याने तिला शैक्षणिक माहिती विचारत शिकवणीपेक्षा मुंबईत नोकरी मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखविले.

त्यानंतर तो दोन ते तीन वेळा तिला भेटला. १० नोव्हेंबरला त्यांची फ्लॅटवर भेट झाली. तेव्हा मुंबईला नोकरीच्या शोधात जायचे ठरले. १४ नोव्हेंबरला रात्री त्याने नऊला रामगिरी हॉटेलसमोर भेटायचे ठरले. त्यानुसार ती आली. त्यानंतर एका कारने महेबूब इब्राहिम शेख तेथे एकटाच आला. सुरुवातीला त्याने तिचा विश्‍वास संपादन करीत कारमध्ये बसवून गप्पा मारल्या. नंतर त्याने कार जालना रस्त्याजवळील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर अंधारात नेली. तेथे तरुणीवर अत्याचार केला.
 

अत्याचारानंतर धमकी
अत्याचाराच्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली आणि कारमधून त्याने उतरवून दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. घडलेल्या प्रकारानंतर भेदरलेली तरुणी घरीच होती. तिने हा प्रकार मावशीला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सिडको पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली. गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्यामुळे शहरातील सुरक्षेचे धिंडवडे निघाले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Epstein files : ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार’ यावर पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी केलं वक्तव्य, फुसका बार की मराठी पंतप्रधान?

Bangladesh Crisis: बांगलादेश पेटला! युवा नेत्याच्या हत्येनंतर राजधानीत आग, वर्तमानपत्रांची कार्यालये जळाली; देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

Mumbai Local Megablock: मुंबई लोकलनं प्रवास करताय? पण मेगाहाल होणार; पाहा कुठे अन् कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

'मी रक्तबंबाळ झालो, ७ वर्षांच्या लेकीला धक्का', पायलटची प्रवाशाला कुटुंबियांसमोर मारहाण

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

SCROLL FOR NEXT