Soygaon 
छत्रपती संभाजीनगर

पहिलाच पाऊस आला, संसार अन् मुके जीवही घेऊन गेला, औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती

सुषेन जाधव

औरंगाबाद: मृग नक्षत्रातील पेरणीसाठी शेतकरी राजाला पावसाची प्रतीक्षा होती. सोयगाव तालुक्यात गुरुवारी (ता.११) मध्यरात्री पाऊस पडलाही; मात्र कुणाचा संसार घेऊन गेला, तर अनेक मुके जीवही नेले. तर काही शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड केलेला कापूस, अद्रक, आर्वी ही पिकेही वाहून गेली.

पावसाळ्यात पाऊस येणारच, नुकसान होणारच; पण संसार उघड्यावर पडण्याइतपत हाल व्हावेत असं कुणाला कधी वाटतं का? अशी भावना ईश्‍वर सपकाळ या तरुण प्रयोगशील शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

गुरुवारी रात्री साडेअकरा ते सव्वाएक या वेळेत सोयगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तिडका, नांदगाव, घोसला, उमरवीरा, बहुलखेडा, जरंडी, कंक्राळा परिसरातही पाणी पाणी झाले. पाऊस इतका मोठा होता, की वाकडी येथील पाझर तलाव १५ मिनिटांतच पूर्णपणे भरला होता. सपकाळ यांच्यासह संतोष गायकवाड, दिलीप क्षीरसागर यांचे अद्रक पीक वाहून गेले.

पुन्हा करावी लागणार पेरणी

ईश्‍वर सपकाळ (रा. तिडका) म्हणाले, की मी १० एकरावर पूर्वहंगामी कापूस  लावला होता, त्यापैकी वीस गुंठे वाहून गेला. भुसभुशीत गाळाची माती थेट नदीत वाहून गेली. ठिबकही वाहून गेले. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, जनावरांसाठी ठेवलेला चारा (भुईमुगाचा पाला, मका कुटी) वाहून गेला. मुळात कपाशीला ठिबक करताना नळ्या ताणून ठोकल्या जातात.

आता मात्र नळी आकुंचन पावत असल्याने पुन्हा ठिबक करताना पाणी कपाशीजवळ पडणार नाही. कपाशीची लागवड केली आहे, त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या शेतातील पाणी, माती वाहून आल्याने कपाशीचे बी मातीत दबले गेले. बहुतांश ठिकाणी एक फुटांचा मातीचा थर बसला तर काही ठिकाणची मातीच वाहून गेल्याने ती कपाशी उगवणार नाही, त्यामुळे नवीन बियाणे लागवड करावी लागणार आहे.

कंक्राळा येथील झोपडपट्टीतील नागरिकांना ग्रामपंचायतीत हलविण्यात आले. काहींचे धान्य वाहून गेले होते. त्यांना सकाळी जीवनावश्‍यक वस्तू देण्यात आल्या. साधारण सहा बैल, कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या. त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याविषयीची मदत तत्काळ देण्यात येणार आहे.
- प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव

आमच्याकडे मागच्या ५० वर्षांपासून इतका मोठा पाऊस झाला नाही. तीन एकरांवर आर्वी पीकलागवड केले होते, त्यापैकी साधारण दहा गुंठ्यांवरील पीक वाहून गेले आहे.
- सरस्वतीबाई सपकाळ, शेतकरी तिडका, ता. सोयगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Kolhapur District Bank Election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, भय्या माने यांच्यासह दिग्गजांना धक्का; सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना सर्कीट बेंचचा दणका

Sindhudurg Farmer Compensation : e-KYC अपूर्ण असल्यास 4 कोटी 41 लाखांची नुकसानभरपाई अडकणार; सिंधुदुर्गातील 'या' 2,212 शेतकऱ्यांना मोठा फटका

Maharashtra Live News : भाजपने निवडणूक आयोगाला ओलीस ठेवले आहे – इम्रान मसूद

IPL 2027 Trade : एक मोठा खेळाडू Mumbai Indians च्या ताफ्यात येतोय? भविष्याचा कर्णधार म्हणून सक्षम पर्याय; आश्चर्यचकित करणारी Deal

SCROLL FOR NEXT