photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : कोरोना बसलाय दबा धरून;  पण रस्ते वाहताहेत भरभरून! 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद ः शहरात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना नागरिकांचे गांभीर्य संपले आहे. त्यात अनलॉक-२ ची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार सायंकाळी पाचनंतर रस्त्यावर शुकशुकाट अपेक्षित आहे; मात्र सायंकाळी हजारो वाहने शहरभर फिरताना दिसत आहेत. शेकडो नागरिक विनाकारण, विनामास्क रस्त्यावर फिरत आहेत. विशेष म्हणजे, आता प्रशासनानेही दुर्लक्ष सुरू केल्याने चिंता आणखी वाढली आहे. 
शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळेच नागरिकांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. मुळात रुग्णांची आकडेवारी कमी असताना लॉकडाउन होते आणि रुग्णसंख्या वाढल्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाली आहे. त्यामुळेच नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने स्वत:चे संरक्षण केल्यास आपोआपच आपल्या कुटुंबीयाचे, समाजाचेही संरक्षण होणार आहे; मात्र हे नागरिक समजून घेण्यास तयार नाहीत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रात्री उशिरापर्यंत वर्दळ 

सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे; मात्र दुकानेही सात वाजेपर्यंत बंद होत नाहीत. नागरिकही उशिरापर्यंत फिरत आहेत. सायंकाळी घोळक्या-घोळक्यांनी रस्त्यावर तरुणांचे जत्थे फिरताना दिसत आहेत. विविध चौकांमध्ये कॉलनीच्या गेटभोवती, वसाहतींच्या कोपऱ्यांवर, चहाच्या गाड्यांभोवतीची गर्दी आणि विनाकारण भटकणाऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांचेही दुर्लक्ष 

दिवसभर रस्त्यावर दिसणारे पोलिस सायंकाळनंतर गायब होत असल्याने वाहनांची वर्दळ थांबायला तयार नाही. 
तीन महिने प्रचंड तणावात दिवस काढलेल्या पोलिसांनी आता मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर तर संचारबंदीसारखी स्थिती आवश्यक आहे. त्यामुळे किमान सायंकाळी तरी पोलिसांनी गस्त वाढवून रिकामटेकड्यांना आवर घालण्याची गरज आहे. 

विनामास्क बिनधास्त 

शहरात विनामास्क फिरणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. महापालिकेतर्फे काही प्रमाणात कारवाई करण्यात येत असली तरीही त्याचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांमध्ये भीती उरली नाही. त्यामुळेच नागरिक बिनधास्त विनामास्क फिरताना दिसत आहे. कोरोनाच्या सार्वजनिक संसर्गाचा साधारण वीस टक्के लोकांना तर साधा गंधही नाही. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

भरभरून रिक्षा अन् ट्रिपल सीट दुचाकी 

रिक्षामध्ये दोन प्रवासी, कारमध्येही तिघेजण आणि दुचाकीवर एकाला प्रवासाची परवानगी आहे; मात्र शहरात रिक्षामध्ये सर्रास पूर्वीप्रमाणे चार ते पाच प्रवासी बसवले जातात. कारमध्येही चौघे प्रवास करताना दिसत आहेत. दुचाकी तर ट्रिपलसीटही दामटल्या जात आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT