संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

सुवर्णयोग... आज रात्री आकाशात डोळ्यांनी... 

संदीप लांडगे

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात पृथ्वीभोवती फिरणारे संशोधन केंद्र आहे. १४ ते १८ मेदरम्यान हे संशोधन केंद्र साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. खगोलशास्त्रप्रेमी, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक विनय जोशी यांनी केले आहे. 

फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठ्या आकाराचे हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवरून ताशी २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे. स्थानकाला रशियन ऑर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट (यूएसओएस) अशा दोन भागांत विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. सध्या यात वेगवेगळ्या देशांच्या अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गुरुवारी (ता. १४) रात्री ८:११ ते ८:१६ या वेळात आयएसएस हे अंतराळ केंद्र दक्षिण आकाशात येऊन ‘चित्रा’ आणि ‘स्वाती’ या ताऱ्यांजवळून जात ईशान्येला मावळेल. यावेळी याची दृश्यप्रत उणे ३.४ असल्याने हे साध्या डोळ्यांनी एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे वेगाने जाताना अत्यंत तेजस्वी दिसेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. १५) संध्याकाळी ७:२४ ते ७:२९ या वेळात आयएसएस दक्षिणेला उगवून पूर्वेकडे जाताना दिसेल. शनिवारी (ता.१६) रात्री ८:१२ ते ८:१८ या वेळेत आयएसएस पश्चिमेला व्याध्याच्या ताऱ्याजवळ उगवत उत्तरेला ध्रुव ताऱ्यापर्यंत जाताना दिसेल.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
रविवारी (ता.१७) संध्याकाळी ७:२४ ते ७:३१ या वेळात आयएसएस पश्चिमेला व्याध्याच्या ताऱ्याजवळ उगवत उत्तरेला सप्तर्षींच्या जवळून जाताना दिसणार आहे. सोमवारी (ता. १८) पहाटे ५:१५ ते ५:२१ या वेळेत आयएसएस वायव्येला उगवत गुरू-शनी यांच्या जवळून जाताना दिसेल. आयएसएस साध्या डोळ्यांनी पाहता येणार असून त्यासाठी दुर्बिणीची गरज पडणार नसल्याचे खगोल अभ्यासक विनय जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT